टुडे पान एक-वेंगुर्लेत 60 सफाई कामगारांना डच्चू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे पान एक-वेंगुर्लेत 60 सफाई कामगारांना डच्चू
टुडे पान एक-वेंगुर्लेत 60 सफाई कामगारांना डच्चू

टुडे पान एक-वेंगुर्लेत 60 सफाई कामगारांना डच्चू

sakal_logo
By

swt१२१४.jpg
२१२९१
सिंधुदुर्गनगरीः वेंगुर्ले नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांबाबत भाजपाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन समस्या मांडल्या.

वेंगुर्लेत ६० सफाई कामगारांना डच्चू
उपासमारीची वेळ ः शहरातील कचरा व्यवस्थापन बिघडले
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १२ ः येथील पालिका प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता ६० कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून काढून टाकल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हे सर्व कामगार आर्थिक संकटात सापडले आहेत. कचरा उचलला जात नसल्याने शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत भाजपाने आवाज उठवला आहे. त्या कंत्राटी कामगारांच्या पाठीशी भाजपा ठामपणे उभा राहिला असून या प्रश्नाची उकल होण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांनी जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालावा, अशी मागणी केली.
भाजपा शिष्टमंडळाने यावेळी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करताना सांगितले की, वेंगुर्ले नगरपरिषद स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आदर्शवत असून अनेक राज्यस्तरीय व केंद्रीय पुरस्कार पाप्त झाले आहेत. यामध्ये या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे; परंतु प्रशासकीय कारभार सुरु झाल्यापासून त्यांच्या पगाराच्या बाबतीत प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. म्हणून जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नी लक्ष घालून या कामगारांच्या पगाराचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे ताबडतोब पाठवीण्याबाबत मुख्याधिकारी यांना निर्देश द्यावेत, अशी मागणी भाजपा शिष्टमंडळाने केली. नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून काम करत असलेले प्रांताधिकारी यांचीही सावंतवाडी येथे जाऊन भेट घेतली व लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी केली.
------------------
चौकट
नगरपालिकेत शुकशुकाट
कंत्राटी कामगार कमी झाल्याने कायम असलेल्या कामगारांवर कामाचा ताण आलेला आहे. नगरपरिषद कार्यालयातील सर्व प्रशासकीय कामे सांभाळणारे अधिकारी, कर्मचारी यांचा अर्धा दिवस कचरा गोळा करण्याच्या कामावर लक्ष देण्यासाठी जात असल्यामुळे कार्यालयात दुपारी १२ ते १२.३० पर्यंत शुकशुकाट असतो. परिणामी कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो व कामही होत नाही. त्यामुळे आगामी काळात प्रलंबित कामांचा डोंगर नगरपालिकेत तर कचऱ्याचा डोंगर शहरात दिसणार आहे.
-------------------
कोट
"प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे निर्माण झालेली परीस्थिती तसेच विकास कामांवर झालेला परीणाम याची दखल वरीष्ठ पातळीवर घेण्यासंदर्भात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मेलद्वारे निदर्शनास आणले आहे. लवकरच भाजपाचे शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कंत्राटी सफाई कामगारांना न्याय देणार."
- प्रसन्ना देसाई, जिल्हा सरचिटणीस
------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57492 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top