चिपळूण ःदेवगडचा आंबा चिपळूणमार्गे सातसमुद्रापार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ःदेवगडचा आंबा चिपळूणमार्गे सातसमुद्रापार
चिपळूण ःदेवगडचा आंबा चिपळूणमार्गे सातसमुद्रापार

चिपळूण ःदेवगडचा आंबा चिपळूणमार्गे सातसमुद्रापार

sakal_logo
By

-rat12p17.jpg-
21271
ः चिपळूण ः खेर्डी येथील गणेश धुरी चिपळूणमधून देश-विदेशात देवगडच्या आंब्याची विक्री करतात.
-------------
देवगडचा आंबा चिपळूणमार्गे सातसमुद्रापार

चीन, जपान, अरब राष्ट्रात निर्यात; महाराष्ट्राबाहेर १५० रुपये किलो दराने विक्री
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः देवगडच्या हापूस आंब्याची गोडी सातासमुद्रापार पोहोचली आहे. खेर्डीतील गणेश धुरी या तरुणाने देवगडचा आंबा चिपळूणमार्गे चीन, जपान आणि अरब राष्ट्रात पाठवला आहे. चांगला दर आणि चांगली गुणवत्ता यामुळे हापूस आंब्याला परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
खेर्डीतील गणेश धुरी यांची देवगड येथे हापूस आंब्याची बाग आहे. त्यांचे चुलत भाऊ ही बाग संभाळतात. बागेतील आंब्याला धुरी ग्राहक मिळवून देतात. गेली पाच वर्षे त्यांनी हा व्यवसाय हळूहळू वाढवला आहे. यापूर्वी मुंबईच्या वाशी मार्केटसह पुणे आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागात आंबा पाठवला होता. धुरी हे लोटे औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत प्रोडक्शन हेड म्हणून कार्यरत होते. या निमित्ताने त्यांची विविध कंपनीच्या व्यवस्थापनाशी चांगले संबंध निर्माण झाले आहे. लोटेतील अनेक कारखान्यांचे मालक विदेशात राहतात. काही कंपन्यांचे विदेशातही प्रकल्प आहेत. येथे काम करून गेलेले अधिकारी विदेशात कार्यरत आहेत. अनेक कारखान्यांचे लेखापरिक्षण करण्यासाठी विदेशातून शिष्टमंडळ येतात. त्यांना रत्नागिरी हापूसऐवजी देवगडचा हापूस आंबा देण्याची कल्पना धुरी यांनी अनेक कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापनाकडे मांडली. दरही ठरवून दिला. त्यामुळे लोटेतील कारखानदारांनी विदेशातील त्यांच्या व्यवस्थापनाला देण्यासाठी देवगडचा आंबा निवडला. तसेच धुरी यांनी दिल्ली, पटणा, पंजाब, गुजरात या बागातही देवगडचा हापूस आंबा पोहचवला.
महाराष्ट्राबाहेर शंभर ते दीडशे रुपये किलो या दराने देवगडच्या आंब्याची विक्री सुरू आहे.
..
चौकट
कॉर्पोरेट सेक्टरमध्ये गिफ्ट देण्यासाठी..
कॉर्पोरेट सेक्टरमध्ये गिफ्ट देण्यासाठी ८०० आणि ६०० रुपये डझन या दराने आंब्याची पेटी उपलब्ध आहे. मुंबई, पुणे आणि राज्याच्या इतर भागात दिवसातून शंभर पेट्या देवगड आंब्याच्या जातात. हा आंबा खराब कसा आणि कधी होतो, याबाबत स्थानिक पातळीवर संशोधन करण्याची योजना गणेश धुरी यांनी आखली आहे. पुढील वर्षी ग्राहकांना सुलभ पद्धतीने आंबा देण्यासाठी प्रयत्न करू, असे धुरी यांनी ''सकाळ''ला सांगितले.
-------------
चौकट
देवगड हापूस आंब्याचा रंग, त्याचा स्वाद रत्नागिरी आंब्यापेक्षा वेगळा असल्यामुळे देश-विदेशातील नागरिकांकडून देवगडच्या हापूस आंब्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही बागेतील सेंद्रिय आंबा विदेशात पाठवायला सुरवात केली आहे. त्यासाठी लोटेतील अनेक कारखानदारांचे सहकार्य मिळाले. देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली इतर आंबाही विकला जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी खात्री करून आंब्या घ्यावा.
- गणेश धुरी, खेर्डी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57496 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top