दाभोळ-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
दाभोळ-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

दाभोळ-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

sakal_logo
By

तीन संस्थांची निवडणूक
प्रक्रिया झाली सुरू
दाभोळ ः दापोली तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधकांनी दापोली तालुक्यातील ३ सहकारी संस्थाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. दापोली ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित दापोली, पूज्य सानेगुरुजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पालगड व पदविका, पदवीधर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दापोली या ३ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. ११ मे रोजी सकाळी ११ वा. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर दावे, हरकती, आक्षेप ११ ते १७ मे दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे लेखी सादर करावयाचे आहेत. प्राप्त दावे, हरकती, आक्षेप यावर १८ ते २४ मे दरम्यान निर्णय देण्यात येणार असून २४ मे रोजी या तिन्ही संस्थांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणार आहे.
----------
सोहनी विद्यामंदिरचे यश
दाभोळ ः सन २०२२ या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्पर्धा परीक्षेत दापोली येथील आदरणीय गोपाळ कृष्ण सोहनी प्राथमिक विद्यामंदिरमधील पहिली ते चौथीच्या ८ विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे. यामध्ये आराध्य पास्ते आणि प्रणव देवघरकर या विद्यार्थ्यांनी अव्वल गुणांसह प्रथम येत सुवर्णपदक प्राप्त केले. यशाची मालिका कायम ठेवत विद्यार्थिनी तन्मया डोंगरे हिने कास्यपदक मिळवले. भार्गवी डोंगरे, मेधावी हजारे, सार्थकी दाभोळे, आराध्या पवार, अर्णव परकाळे या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम गुणांसह गुणवत्ता यादीत अव्वल क्रमांक प्राप्त करत प्रशालेचे नाव उज्ज्वल केले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाचालक व शाळेचे मुख्याध्यापक अनिल शेठ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी अभिनंदन केले आहे.
---------------
माजी विद्यार्थ्यांचा उद्या
समाजोपयोगी कार्यक्रम
मंडणगड ः तालुक्यातील दहागाव येथील लालबहादूर शास्त्री हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा एक आगळावेगळा कार्यक्रम १४ मे रोजी होणार आहे. एलबीएसएच माजी विद्यार्थी मंचमार्फत आपली शाळा व समाज यांचे काही देणे लागतो, या भावनेतून कार्य सुरू असून शैक्षणिक व समाजोपयोगी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत. यावर्षी माजी विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय एकत्रित येणार आहेत. शाळेत क्रिकेट स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा घेणार आहेत. तसेच स्मार्ट टीव्ही भेट, दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांस सिलॅबस आणि होमवर्कसह पेनड्राईव्ह, शिष्यवृत्ती मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन घेण्यात आले. कोरोना काळात मंडणगड, दापोली सर्व आरोग्य केंद्रात मेडिकल कीट वाटप, आरोग्य शिबिर घेण्यात आली. आठवणींना उजाळा, गौरवसंध्या, गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा उपक्रम राबवण्यात आले.
-----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57498 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top