कणकवली : अपघात वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : अपघात वृत्त
कणकवली : अपघात वृत्त

कणकवली : अपघात वृत्त

sakal_logo
By

kan१२१.jpg, kan१२२.jpg
२१३३३
नडगिवे : येथील अपघातामध्ये मोटारीचे झालेले नुकसान. (छायाचित्र : अनिकेत जामसंडेकर)
--------------------
खारेपाटण - नडगिवे येथे अपघात
दुचाकीस्वार गंभीर; मोटारीचेही नुकसान
खारेपाटण, ता. १२ : मुंबई गोवा महामार्गावर खारेपाटण शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील नडगिवे घाटीत मोटार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. जखमी दुचाकीस्वार व्हॅनिश हजायॉ डिसोझा (वय २७, राह. कुर्ला मुंबई) याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
व्हॅनिश डिसोजा हा दुचाकीवरून (एम एच ०३ डीजे १२६६) मुंबईहून गोव्याला जात होता. तर खेड येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील अधिकारी हे कणकवली ते खेड असा प्रवास करत होते. नडगिवे घाटीतील एका वळणावर भरधाव वेगाने आलल्या दुचाकीची मोटारीला (एमएच ०५ डीएस ३१८३) धडक बसली. त्‍यानंतर तो रस्त्यावर फेकला गेला. यात डिसोझा याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच नडगिवे सरपंच अमित मांजरेकर, उपसरपंच अरुण कर्ले, भावेश कर्ले, भाऊ राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी डिसोझा याला उपचाराकरिता कणकवली पाठविले. दरम्‍यान अपघातस्थळी खारेपाटण प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांनीही भेट दिली होती. अपघातानंतर खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे अधिकारी श्री. मोहिते यांनी अपघातस्थळी तातडीने भेट देऊन ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरची दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला केली.

चौकट
नडगिवेतील वळणावर वारंवार अपघात
नडगिवे घाटीतील काही जागेच्या भूसंपादनाचा विषय पूर्ण न झाल्‍याने घाटातील काही भागातून एकाच मार्गिकेवरून वाहतूक केली जात आहे. महामार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना त्‍याचा अंदाज येत नाही. त्‍यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. त्‍यामुळे भूसंपादनाचा विषय मिटवून येथील दोन्ही मार्गिका खुली करण्याची मागणी वाहन चालकांतून होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57515 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top