कणकवली : अविश्‍वास ठराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : अविश्‍वास ठराव
कणकवली : अविश्‍वास ठराव

कणकवली : अविश्‍वास ठराव

sakal_logo
By

L21335
पूजा घाडीगावकर


वागदे सरपंच पूजा घाडीगावकर
यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर

कणकवली, ता.१२ : वागदे ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा घाडीगावकर यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. या ठरावा करिता पीठासन अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार शिवाजी राठोड यांनी काम पाहिले.
वागदे सरपंच पूजा घाडीगावकर यांनी नुकताच शिवसेनेतून भाजप पक्षात प्रवेश केला होता. त्‍यानंतर ग्रामपंचायत सदस्यांनी त्‍यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव तहसीलदारांकडे दाखल केला होता. या ठरावाच्या अनुषंगाने आज वागदे ग्रामपंचायतीमध्ये प्रभारी तहसीलदार शिवाजी राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला सरपंच पूजा घाडीगावकर या अनुपस्थित राहिल्या. तर ग्रामपंचायतचे ८ सदस्य या बैठकीला हजर होते. ० विरुद्ध ८ अशा बहुमताने आजच्या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला. आता हा ठराव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार शिवाजी राठोड यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57516 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top