कणकवली : परुळेकर पत्रक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : परुळेकर पत्रक
कणकवली : परुळेकर पत्रक

कणकवली : परुळेकर पत्रक

sakal_logo
By

स्ट्रीट लाईटचा निधी नगराध्यक्ष यांच्या प्रयत्‍नामुळे
नगरसेवक शिशिर परुळेकर यांचा दावा

कणकवली, ता.१२ : कणकवली शहरातील नाथ पै नगर आणि बिजलीनगर येथील स्ट्रीट लाईट कामांसाठी ३० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केलेल्‍या पाठपुराव्यामुळेच मंजूर झाल्‍याचा दावा भाजप नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी पत्रकातून केला आहे.
श्री.परुळेकर यांनी म्‍हटले की, नगरपंचायतीचे विरोधी पक्षगट नेते सुशांत नाईक यांनी, नागरी सहाय्य योजनेतून स्ट्रीट लाईट कामांसाठी ३० लाख रूपयांचा निधी आणल्‍याचा दावा केला होता. मात्र त्‍यांचा हा दावा फसवा आहे. या निधीसाठी नगराध्यक्ष श्री.नलावडे आणि इतर सत्ताधारी नगरसेवकांनी सातत्‍याने पाठपुरावा ठेवला होता.
दरम्‍यान शहरातील श्रीधर नाईक येथील उद्यानासाठीही ७५ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्‍यानंतर या उद्यानाचेही काम प्रगतीपथावर आहे. याखेरीज शहरात अनेक अंतर्गत जोड रस्ते, स्पोर्ट कॉम्प्लेक्‍स व इतर कामे प्रगतीपथावर आहेत. राज्‍यात शिवसेनेची सत्ता आहे, मात्र शहरासाठी कोणतीही लक्षवेधी विकास कामांची मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून झालेली नाही. फक्‍त आम्‍ही मंजूर करून आणलेल्‍या कामांचे श्रेय शिवसेनेची मंडळी घेत असल्‍याचे श्री.परुळेकर यांनी म्‍हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57521 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top