ओटव फाटा, नांदगाव तिठा रस्ता प्रश्न जैसे थे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओटव फाटा, नांदगाव
तिठा रस्ता प्रश्न जैसे थे
ओटव फाटा, नांदगाव तिठा रस्ता प्रश्न जैसे थे

ओटव फाटा, नांदगाव तिठा रस्ता प्रश्न जैसे थे

sakal_logo
By

swt1216.jpg
21347
नांदगाव ः सेवा रस्त्याबाबत पाहणी करताना महामार्ग प्राधिकरण अधिकारी व स्थानिक.

ओटव फाटा, नांदगाव
तिठा रस्ता प्रश्न जैसे थे
उपोषणाचा इशारा ः अधिकाऱ्यांकडून पहाणी
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १२ः अपघाताला निमंत्रण ठरत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव येथील ओटव फाटा व नांदगाव तिठा येथे दोन्ही पुलाजवळील एका बाजूच्या सेवा रस्ता संदर्भात प्रश्न अद्याप सुटलेला नाही. या अनुषंगाने गेल्या आठवड्यात नांदगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ नागरिक यांनी प्रांताधिकारी कणकवली यांना आठ दिवसांत सर्व्हिस रोड संदर्भात प्रश्न न सुटल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा निवेदनाव्दारे दिला होता. या पार्श्वभूमीवर आज हायवे प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास, शाखा उप अभियंता कुमावत यांनी नांदगाव येथे भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली आहे. यावेळी भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, कमलेश पाटील, ऋषिकेश मोरजकर, मंगेश बोभाटे, राजू तांबे, दिपक मोरजकर आदींनी चर्चेत सहभाग घेतला होता. या सर्व्हिस रोड आणि गटार व्यवस्थापन व काही ठिकाणी ओहळाचे काम अर्धवट स्थितीत गेल्या वर्षीपासून ठेवण्यात आले आहे. दिशा दर्शक फलक नसल्याने वाहन धारकांना त्रास होत आहे. आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
छोटी छोटी कामे अर्धवट स्थितीत असलेले कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी सुचनाही ठेकेदार कंपनीला देण्यात आल्या आहेत.
दोन दिवसांत सर्व्हिस रोड कामांना सुरुवात करा न पेक्षा एका साईड पुलावरून वाहतूक व्यवस्था बंद करून एका साईड सर्व्हिस रोड ने वळवा अन्यथा १४ ला बेमुदत उपोषण होणारच असल्याचे आंदोलकांच्यावतीने सांगण्यात आले.
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57529 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top