रत्नागिरी- धनगर समाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- धनगर समाज
रत्नागिरी- धनगर समाज

रत्नागिरी- धनगर समाज

sakal_logo
By

-rat12p30.jpg
L21355
- प्रवीण काकडे
-----------
महाआघाडीने धनगर समाजासाठी काय केले?

प्रवीण काकडेंचा सवाल; अहिल्यादेवी महामंडळास निधीच नसल्याचा आरोप
रत्नागिरी, ता १२ ः महाराष्ट्रात धनगर समाज हा दोन नंबरवर असलेला व अतिमागास असलेल्या धनगर समाजाला यातून का वगळण्यात आले. मेंढपाळांसाठी असणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळास कसलाही निधी दिला नाही. महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यापासून धनगर समाजाला कोणत्या सुविधा मागण्या पूर्ण केल्या आहेत, त्याचा एकदा तपशील जाहीर करावा, अशी मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळाची बैठक २८ एप्रिलला सामाजिक न्याय विभागाकडून घेण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने महामंडळाना भरीव निधी देण्याचा ठराव करण्यात आला. महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ ५०० कोटींवरून १००० कोटी, संत रोहिदास उद्योग व चर्मकार विकास महामंडळ ७३ कोटींवरून १००० कोटी, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ ३०० कोटीवरून १००० कोटी, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ ५० कोटींवरून ५०० कोटी एवढा निधी देण्यात आला; परंतु शेळी-मेंढी विकास महामंडळास वाढीव निधी दिलेला नाही. धनगर समाजाची गेली कित्येक वर्षांपासून एसटी आरक्षण देण्याबाबतची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी कायमस्वरूपी बाजूलाच ठेवली आहे. सरकारकडून मागील अर्थसंकल्पात कोणत्या स्वरूपात किती निधी देण्यात आला आहे, ते जाहीर करण्यात यावे. धनगर समाजाच्या एकाही प्रश्नाची सोडवणूक केलेली नाही. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीबाबत आजअखेर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
-------------
चौकट
समाज सुविधांपासून वंचित
धनगर समाजातील गोरगरीब विद्यार्थी याच्या स्कॉलरशिप बाबतीत, डोंगरदऱ्याखोऱ्यातील गोरगरीब समाजबांधवांना आजही रस्ते, आरोग्य, पाणी, विजेच्या सुविधांपासून वंचित ठेवण्यात आलेय. अशाप्रकारे धनगर समाजाला सर्वच सोयीसुविधांपासून वंचित ठेवण्यात येणार असेल तर पुढील काळात धनगर समाज निवडणुकीत जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रवीण काकडे यांनी केला आहे.
..
चौकट
समाजाने काय तुमचे घोडे मारले?
प्रवीण काकडे म्हणाले, धनगर समाजाने काय तुमचे घोडे मारले? का सातत्याने धनगर समाजावर अन्याय करत आहात? डोंगरी भागात राहणाऱ्या समाजबांधवांना सातत्याने वनविभागाच्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. धनगर समाजाला या सर्वच प्रक्रियेतून जाणुनबुजून वंचित ठेवण्यात येत आहे. सर्वच राजकीय लोकप्रतिनिधींकडून धनगर समाजाच्या मतावर निवडून आले आहेत. मंत्री, खासदार, आमदार यांनी धनगर समाजाच्या मागण्या मान्य होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पण तसा अजून कोणीच प्रयत्न करीत नाहीत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57536 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top