
रत्नागिरी- संक्षिप्त
खल्वायनची संगीत सभा रंगणार
रत्नागिरी ः येथील खल्वायन-रत्नागिरी या संस्थेची मासिक संगीत सभा शनिवारी (ता. १४) सायंकाळी सात ते नऊ या वेळात गोदूताई जांभेकर विद्यालयात होणार आहे. ही मैफल हार्मोनियम आणि सोलोवादनाने रंगणार आहे. कोल्हापूरचे पंडित प्रमोद मराठे यांचे शिष्य युवाकलाकार स्वरुप प्रसाद दिवाण हार्मोनियम, तर तबला गिरीधर कुलकर्णी यांचे शिष्य ओंकार दीपक ब्रीद (कोसुंब, ता. संगमेश्वर) यांचे सोलोवादन होणार आहे. विनाशुल्क असलेल्या या मैफलीचा आस्वाद संगीतप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.
-------
टपाल कार्यालयात ऑनलाईन व्यवहार
रत्नागिरी ः जिल्ह्यातील टपाल कार्यालयात आता भीम फोन पे, गुगल पेद्वारे ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्याभरातील सर्वच टपाल कार्यालयात ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. पूर्वी ग्राहकांना कार्यालयात रजिस्टर, स्पीडपोस्ट, पार्सल बुक केलेनंतर सर्वच व्यवहार कॅशमध्ये करावे लागत होते. त्यावेळी सुट्टे पैसे देण्याचा आग्रह केला जायचा तसेच देवाण-घेवाणला वेळ लागत होता. नव्या पिढीची गरज ओळखून रत्नागिरी जिल्ह्यातील टपाल कार्यालयांनी यूपीआय कार्यप्रणाली अंगीकारून क्युआर कोडद्वारे पेमेंट करण्याची सुविधा सुरू केली. यामुळे जिल्ह्यातील सर्वंच टपाल कार्यालयात मल्टीपर्पज काऊंटवर रजिस्टर, स्पीडपोस्ट, पार्सल, बिझनेस पार्सल, इंटरनॅशनल लेटर आणि पार्सल्स डायरेक्ट पोस्ट सर्व्हिस विविध प्रकारच्या परीक्षा फी अशा विविध प्रकारच्या सेवांचे व्यवहार कॅशलेस होणार आहेत. जिल्ह्यातील ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी विभागाचे डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले.
----
नाचणे शाळेत मुलांसाठी उन्हाळी शिबिर
रत्नागिरी ः शहराजवळील नाचणे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर नं १ यांच्या वतीने १४ ते १५ मे रोजी तीन ते बारा वर्षे वयोगटातील मुलांसाठी विनामूल्य उन्हाळी शिबिराचे आयोजन केले आहे. ओम साई मित्र मंडळाच्या सभागृहात हे शिबिर सकाळी साडेसात ते साडेअकरा या वेळात होणार आहे. शिबिरात योगा, जादूचे प्रयोग, ओरिगामी, क्राफ्ट, मनोरंजन खेळ, पक्ष्यांचे आवाज, फेस पेंटिंग, आजी-आजोबांच्या गोष्टी यांचा समावेश आहे. यासाठी रत्नागिरी व मुंबईतील नामवंत कलाकार मार्गदर्शक म्हणून येणार आहेत. रत्नागिरी शहर व परिसरातील मुलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच ऋषिकेश भोंगले, उपसरपंच निलेखा नाईक, सदस्य शैलेश मालप, शुभम सावंत, मुख्याध्यापिका अनुप्रिता आठल्ये आणि या शिबिराचे मुख्य संयोजक दीपक नागवेकर यांनी केले आहे.
-----
-rat12p20.jpg
21289
डॉ. ज्योती पेठकर, डॉ. शामराव वाघमारे, डॉ. महेश कुलकर्णी
-------------
मुंडे कॉलेजात मान्यवरांचा सत्कार
मंडणगड ः येथील मुंडे महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या डॉ. ज्योती पेठकर यांना तलासरी येथील आदिवासी प्रगती मंडळ संचलित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयाच्या वतीने ''कॉम्रेड गोदावरी परुळेकर समाजरत्न पुरस्कार'' नुकताच देण्यात आला. इंग्रजी विभागाचे डॉ. शामराव वाघमारे यांची मुंबई विद्यापीठाच्या वतीने इंग्रजी विषयाचे पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून नेमणूक झाली आहे. तसेच गणित विभागाचे डॉ. महेश कुलकर्णी यांची महाराष्ट्र राज्य फॅक्लटी डेव्हलमपेंट अॅकॅडमी, मुंबई लेवल टू प्रक्षिणासाठी निवड झाली आहे. याबद्दल महाविद्यालयाने त्यांचा सत्कार केला. या वेळी प्राचार्य प्रा. डॉ. राहुल जाधव उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादा इदाते, अमर साबळे, श्रीराम इदाते, सतीश शेठ उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57537 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..