अभय योजनेसंदर्भात करसल्लागार असोसिएशनतर्फे मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभय योजनेसंदर्भात करसल्लागार असोसिएशनतर्फे मार्गदर्शन
अभय योजनेसंदर्भात करसल्लागार असोसिएशनतर्फे मार्गदर्शन

अभय योजनेसंदर्भात करसल्लागार असोसिएशनतर्फे मार्गदर्शन

sakal_logo
By

rat12p28.jpg-
21307
रत्नागिरी : करसल्लागार असोसिएशन आणि राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या विद्यमाने आयोजित चर्चासत्राप्रसंगी उपस्थित ॲड. अभिजित बेर्डे, श्रीमती थोरात आणि पदाधिकारी.
-------------
करसल्लागार असोसिएशनतर्फे मार्गदर्शन
अभय योजनेसंदर्भात माहिती; राज्य वस्तू व सेवा कर विभागाचे सहकार्य
रत्नागिरी, ता. १३ : कर सल्लागार असोसिएशनतर्फे (रत्नागिरी जिल्हा) आणि राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्यावतीने अभय योजनेबाबत माहितीसत्र व्यंकटेश हॉटेल येथे झाले. शासनाने जाहीर केलेल्या व्हॅट व इतर कर कायद्याखाली विलंबित असलेल्या कर देयतेसाठी अभय योजना जाहीर केली आहे. अभय योजनेबाबत माहिती देण्यासाठी सांगली येथून राज्य वस्तू व सेवा कर उपायुक्त सचिन जोशी उपस्थित होते.
राज्य वस्तू व सेवा कर कोल्हापूर विभागाच्या सहआयुक्त श्रीमती थोरात, उपायुक्त श्रीमती मिश्किन व रत्नागिरी विभागाचे उपायुक्त संतोष डाफळे, संस्थेचे अध्यक्ष ॲड. अभिजित बेर्डे यांनी मार्गदर्शन केले.
अभय योजना अजून प्रभावी होण्याच्या दृष्टिने काही सूचना करसल्लागार असोसिएशनतर्फे निवेदन राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या सहआयुक्त श्रीमती थोरात यांना सादर केले. त्यांनी हे निवेदन योग्य त्या सरकारी खात्यापर्यंत पुढील निर्णयासाठी पाठविण्याचे आश्वासन दिले. विक्रीकर विभागातर्फे उपायुक्त श्रीमती मिश्कीन यांनी संस्थेचे, करदात्यांचे आभार मानले. सुत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष सीए वरदराज पंडीत यांनी केले. खजिनदार ॲड. उज्ज्वल बापट यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. अभिजित बेर्डे, उपाध्यक्ष सीए वरदराज पंडीत, सचिव राजेश गांगण, खजिनदार ॲड. उज्ज्वल बापट, कमिटी सदस्य सीए मंदार गाडगीळ, रमाकांत पाथरे, ॲड. नीलेश भिंगार्डे, दिनकर माळी, सीए मंदार देवल, सीए अभिजित पटवर्धन आणि चंद्रशेखर साप्ते यानी विशेष परीश्रम घेतले.
--------
चौकट
करदाते, सभासदांसाठी चर्चासत्रे
करसल्लागार असोसिएशन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराबाबत व्यापारी/करदाते आणि त्यांचे सभासद यांना अद्ययावत माहिती देण्यासाठी वारंवार चर्चासत्रांचे आयोजन करीत असते. जीएसटी कायदा अस्तित्वात येण्याअगोदर व नंतरही जीएसटी कायद्यातील तरतुदी, आयकर कायद्यातील तरतुदी याबाबत करदात्याना तसेच सभासदाना माहिती व्हावी, यासाठी मोफत चर्चासत्रे आयोजित केली जातात.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57538 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top