
चिपळूण-चिपळूण बसस्थानकाचे एका बाजूचे छप्पर कोसळले
चिपळूण जुने बसस्थानकः लोगो
...
-ratchl124.jpg
21294
-ः चिपळूण ः येथील जुन्या बसस्थानकाचे कोसळलेले छप्पर.
-----------------
इमारत धोकादायक; प्रवांशी संतप्त
दुर्लक्षामुळे चिपळूण एसटी प्रवाशांमधून संताप; एका बाजूचे छप्पर कोसळले, नवीन स्थानकाचे कामही रखडले
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः एकीकडे चिपळुणातील मुख्य हायटेक बसस्थानकाचे काम रेंगाळलेले असतानाच शहरातील जुन्या बसस्थानकाची इमारतही अखेरची घटका मोजू लागल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. या बसस्थानक इमारतीच्या एकाबाजूकडील छप्पर कोसळले असून ही इमारतही जीर्ण झाली आहे. पावसाळा तोंडावर असतानाही या इमारतीच्या डागडुजीचा मुहूर्त आगार व्यवस्थापनाला सापडला नसल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
शहराच्या बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी जुना बसस्थानक आहे. गुहागर मार्गासह लगतच्या गावांकडे जाणारे शेकडो प्रवासी या बसस्थानकातील निवारा शेडचा आधार घेतात. या बसस्थानकाची इमारत जुनी असून ती जीर्णावस्थेत आहे. काही वर्षांपूर्वी प्रवासी, माध्यमांमधून ओरड होताच या इमारतीच्या छप्परची दुरुस्ती करण्यात आली होती; मात्र त्यानंतर आजतागायत या इमारतीच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आलेले नाही. किंबहुना तेवढा वेळही कदाचित आगार व्यवस्थापनाला नसल्याचे दिसते. २२ जुलै २०२१ च्या महापुराचा आणि अतिवृष्टीचा फटका या बसस्थानकालाही बसला होता. शिवाय चिपळूण तालुक्यात झालेल्या चक्रीवादळाचाही तडाखा बसला.
..
चौकट
मोठा अपघात घडण्याचीही शक्यता
त्यातच काही महिन्यांपूर्वी या बसस्थानक इमारतीच्या एका भागाकडील छप्परच कोसळले. त्याची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात संपूर्ण इमारतीलाच धोका निर्माण झाला असून प्रवाशांना भर पावसात एसटीची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. या शिवाय या इमारतीचे दुसऱ्या भागाचे छप्पर कोसळल्यास त्यामध्ये मोठा अपघात घडण्याचीही स्थिती निर्माण झाली आहे.
----------
कोट
चिपळूण आगाराच्या जुन्या बसस्थानकाची इमारत कोसळण्याच्या मार्गावर आहे. कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अस्वच्छतेमुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिसराची साफसफाई केली जात नाही. अनेकवेळा चिपळूण आगार व्यवस्थापनाला याबाबत माहिती दिली. ओरडून ओरडून आमचाच घसा कोरडा पडला. आगार व्यवस्थापन मात्र तरीही लक्ष देत नाही. पालिका प्रशासनाला विनंती करून सध्या या परिसराची स्वच्छता केली जाते; मात्र ती सुद्धा नियमित नसल्याने अस्वच्छतेचा विषय जैसे थे आहे.
- बिपिन कापडी, हॉटेल व्यावसायिक
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57539 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..