रत्नागिरी-परिचारिकांच्या अनेक भूमिका खडतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-परिचारिकांच्या अनेक भूमिका खडतर
रत्नागिरी-परिचारिकांच्या अनेक भूमिका खडतर

रत्नागिरी-परिचारिकांच्या अनेक भूमिका खडतर

sakal_logo
By

-rat12p31.jpg
L21350
संगमेश्वर ः जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात लेखक डॉ. आनंद आंबेकर यांनी त्यांचे परिचारिकांवरील पुस्तक प्राचार्य प्रज्ञा कदम यांना भेट दिले. या प्रसंगी डावीकडून अभिजित हेगशेट्ये, डॉ. रूबी तावडे व परिचारिका आदी.
-------------
परिचारिकांची भूमिका पुस्तक
तणावमुक्तीसाठी मार्गदर्शकः डॉ. आंबेकर
रत्नागिरी, ता. १२ ः परिचारिका या समाजातील केंद्रस्थानी असलेल्या घटकांपैकी एक आहेत. त्यांच्या अनेक भूमिका खडतर प्रवास करत असतात. अशा वेळेला कामाचा ताण येणे स्वाभाविक आहे. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिकांची भूमिका हे पुस्तक शास्त्रशुद्ध तणावमुक्तीसाठी आपणास मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन लेखक डॉ. आनंद आंबेकर यांनी केले.
जागतिक परिचारिका दिनानिमित्त नवनिर्माण नर्सिंग कॉलेज (संगमेश्वर) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नागपूरच्या डॉ. रुबी तायडे, माजी पंचायत समिती सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्या चंद्रभागा आंबेकर, नवनिर्माण संस्थेचे संस्थापक अभिजित हेगशेट्ये उपस्थित होते. या वेळी डॉ. आनंद आंबेकर यांच्या नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रज्ञा कदम यांच्याकडे भेट देण्यात आले. नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.
..
चौकट
संशोधन करून तयार केलेले पुस्तक उपयुक्त
या प्रसंगी हेगशेट्ये म्हणाले की, फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या कार्याने प्रेरित झालेल्या परिचारिका व्यवस्थेला व्यावसायिक ग्रुपचे रूप निर्माण झाले आणि जगाला नवीन आरोग्यसेवा देणारी व्यवस्था तयार झाली. सुरवातीला विधवा किंवा लग्न न झालेल्या स्त्रिया नर्सिंग क्षेत्रात काम करत होत्या; पण आता विवाहित स्त्रिया या क्षेत्रात आल्याने अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. अशावेळी डॉ. आंबेकर यांनी संशोधन करून साकारलेले पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57561 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top