रत्नागिरी- फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये रस्ता सुरक्षा कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये रस्ता सुरक्षा कार्यक्रम
रत्नागिरी- फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये रस्ता सुरक्षा कार्यक्रम

रत्नागिरी- फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये रस्ता सुरक्षा कार्यक्रम

sakal_logo
By

-rat12p32.jpg
21351
ः रत्नागिरी ः फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये रस्ता सुरक्षा कार्यक्रमात उपस्थित उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसमवेत विद्यार्थी.
...
फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये रस्ता सुरक्षा कार्यक्रम

रत्नागिरी, ता. १२ ः फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षा या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, अतिरिक्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांच्या प्रेरणेतून ऋषिकेश कोरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला.
जयंत गुरव व अमोल कदम यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना खुमासदार शैलीमध्ये रस्ता सुरक्षेविषयी माहिती दिली व विद्यार्थ्यांना बोलते करून त्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. त्यांनी आपल्या भाषणात रस्ता सुरक्षा, रस्ता वाहतूक, रस्ता सुरक्षेच्या नियम व नियमांबद्दल सामाजिक जागरूकता, रस्त्यावरील चिन्हांचा अर्थ, हेल्मेट वापरणे किती आवश्यक आहे, या विषयी सविस्तर माहिती दिली. सद्यःस्थितीत वाढत्या अपघातसंख्येत, कार्यक्रम हा अतिशय महत्वपूर्ण व जीवनरक्षक असा होता. या कार्यक्रमाला १७० हून अधिक विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. योगेश मुळ्ये आणि रजिस्ट्रार गजानन तारगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57562 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top