देवरुखात जागतिक परिचारिका दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरुखात जागतिक परिचारिका दिन साजरा
देवरुखात जागतिक परिचारिका दिन साजरा

देवरुखात जागतिक परिचारिका दिन साजरा

sakal_logo
By

rat१२p३३.jpg
21352
देवरूखः परिचारिकांना शुभेच्छा देताना संगमेश्वर तालुका प्रेस क्लब व सावरकर चौक मित्रमंडळाचे सदस्य.


देवरुखात जागतिक परिचारिका दिन साजरा
साडवली, ता. १३ ः देवरूख येथे संगमेश्वर तालुका प्रेस क्लब व सावरकर चौक मित्रमंडळ यांच्यावतीने जागतिक परिचारिका दिनानिमित्त (ता.१२) देवरूख ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका व स्टाफ यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, डॉ. संदीप माने, प्रमोद हर्डीकर, सुरेश करंडे, सावरकर चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष राजू वणकुद्रे, रेवा कदम, मेडिकल कौन्सिलर जान्हवी टक्के आदी उपस्थित होते. आर्ते यांनी परिचारिकांचे कौतुक करताना कोविड काळात जीवाची पर्वा न करता त्यांनी काम केल्याचे सांगितले. कुटुंब सांभाळून रुग्णसेवा करतात हा त्यांचा त्याग आहे, असे आर्ते म्हणाले. रेवा कदम यांनी आभार मानले.
या वेळी डॉ. संदीप माने यांनी देवरूख ग्रामीण रुग्णालय हे सध्या साध्या जागेत सुरू असून सुविधांची वानवा जाणवत आहे. रुग्णसेवा करताना मर्यादा येत आहेत. तसेच ७ परिचारिका असून, त्यापैकी ३ परिचारिका प्रसुती रजेवर आहेत. यामुळे या ठिकाणी परिचारिका उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने दखल घ्यायला हवी, असे मत व्यक्त केले. किमान तीन महिन्यांसाठी अन्य ठिकाणच्या परिचारिकांची नेमणूक झाली तर चार परिचारिकांवरील कामाचा तण कमी होईल, असे माने म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57563 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top