रत्नागिरी-रत्नागिरी बसस्थानकाचे अंदाजपत्रक वाढवून द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-रत्नागिरी बसस्थानकाचे अंदाजपत्रक वाढवून द्या
रत्नागिरी-रत्नागिरी बसस्थानकाचे अंदाजपत्रक वाढवून द्या

रत्नागिरी-रत्नागिरी बसस्थानकाचे अंदाजपत्रक वाढवून द्या

sakal_logo
By

पैसे चित्र वापरा
...
रत्नागिरी बसस्थानकाचे अंदाजपत्रक वाढवून द्या

एसटी महामंडळाकडे ठेकेदाराची मागणी; ५० टक्के वाढीव हवेत
रत्नागिरी, ता. १२ : राज्यासह जिल्ह्यातील हायटेक बसस्थानकाचा प्रश्न गंभीर बनला आहे. कोरोना महामारी व अन्य अडचणीमुळे गेली तीन वर्षे हे काम रखडले आहे. त्यात रत्नागिरी हायटेक बसस्थानकाचे काम १० कोटीमध्ये पूर्ण करायचे आहे. वाढत्या महागाईमुळे त्या बजेटमध्ये हे काम होणार नसल्याने ५० टक्के बजेट वाढवून द्यावे, अशी मागणी ठेकेदारांनी एसटी महामंडळाकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्यातील ठेकेदार असोसिएशनने हा मुद्दा उचलून धरल्याचे समजते. त्यामुळे या मागणीवर या आठवडाभरात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाने दिली. सहा सात वर्षांपूर्वी जेव्हा एसटी बसस्थानकाचे कामाची निविदा निघाली, तेव्हा ती १७ कोटींची होती. मात्र, त्यानंतर सरकार बदलले आणि निविदाही बदलली. १० कोटींची निविदा निघाली. मात्र, त्यानंतर कोरोनामुळे बांधकाम साहित्याचे दर वाढले. त्यामुळे १० कोटी रुपये कामासाठी पुरणारे नाहीत. यामध्ये ५० टक्के वाढ करुन द्यावी, अशी मागणी ठेकेदारांनी केली. हे पत्र त्यांनी महामंडळाच्या अध्यक्षांकडे सादर केले आहे. अद्यापही यावर तोडगा काढण्यात आलेला नाही. मात्र आठवडाभरात यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
-----------
चौकट
सत्तर कामे बजेटवाढीमुळे प्रलंबित
महाराष्ट्रातील एसटी जवळपास ७० कामे बजेट वाढीच्या मागणीमुळे रखडले असल्याची धक्कादायक माहिती महामंडळाकडून समोर आली आहे. ठेकेदार असोसिएशनकडून बजेट वाढवून देण्याची मागणी केल्याने ही सर्व कामे बंद ठेवली आहेत. केवळ महाराष्ट्रातील २३ बसस्थानकांची कामे पूर्ण झाले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57575 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top