
रत्नागिरी ः भाट्ये किनारी दुर्मिळ केंड मासा मृतावस्थेत
बातमी ठळक लावा
....
- rat12p25.jpg
21301
- रत्नागिरी ः भाट्ये किनारी आढळलेला केंड मासा.
------------
भाट्ये किनारी दुर्मिळ केंड मासा मृतावस्थेत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः रत्नागिरीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळ भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना काटेरी केंड हा विषारी असलेला अत्यंत दुर्मिळ मासा मृतावस्थेत आढळून आला आहे. हा मासा अतिशय विषारी प्रकारातील मासा आहे. शत्रू जवळ येताच तो त्याचा आकार फुटबॉलसारखा फुगवतो. हा पश्चिम किनारपट्टीला आढळतो. त्याच्या सात प्रकारच्या जाती आहेत. काटेवाला प्रकारातील माशाच्या अंगावर काटे जास्त असतात. जपानसारख्या देशात हे केंड मासे खाल्ले जातात; पण त्या वेळी या माशावर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया केली जाते. अवयव काढून कातडीमध्ये असलेले विषारी असलेला टॉक्सिन हा पदार्थ काढून घेतला जातो. त्यानंतरच यापासून पदार्थ तयार केले जातात. प्राचीन काळी हा मासा सुकवला जात असे. तो सुकला की त्याच्या आतील घटक काढून त्याचा डोक्यावरील शिरस्त्राण म्हणून वापर केला जात असे, असे मत्स्य संशोधकांकडून सांगण्यात आले.
..
चौकट
..हे त्याचे वैशिष्ट्य
ज्या वेळी हा मासा सर्वसाधारण माशाच्या आकाराचा असतो, त्या वेळी त्याच्या अंगावर काटे दिसत नाहीत; पण ज्या वेळी एखादा शत्रू प्राणी किंवा मनुष्य त्याच्याजवळ येतो, तेव्हा त्याच्या पोटात असलेल्या हवेच्या पिशवीच्या माध्यमातून हवा पोटात घेतो आणी आपला आकार हा जणू फुटबॉलसारखा करतो. त्या वेळेस काटे टोकदार होतात, हे त्याचे वैशिष्ट्य मानले जाते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57585 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..