रत्नागिरी ः शामराव पेजे महामंडळातर्फे कर्ज योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः शामराव पेजे महामंडळातर्फे कर्ज योजना
रत्नागिरी ः शामराव पेजे महामंडळातर्फे कर्ज योजना

रत्नागिरी ः शामराव पेजे महामंडळातर्फे कर्ज योजना

sakal_logo
By

शामराव पेजे महामंडळातर्फे कर्ज योजना

रत्नागिरी, ता. १२ ः समाजातील इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत विविध कर्जयोजना राबवण्यात येतात. महामंडळाकडून थेट कर्ज योजना १ लाख ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्षे असावे. त्याचे कौंटुबिक वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त नसून जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे आवश्यक आहेत. कर्ज बिनव्याजी असून, कर्ज परतफेडीचा कालावधी ४ वर्षे असणार आहे. कर्ज मंजुरीनंतर शासकीय जामीनदार व इतर वैधानिक दस्तावेज आवश्यक आहेत. कर्जासाठीचे अर्ज उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व इतर माहितीकरिता जिल्हा व्यवस्थापक प्रीती पाटील यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57586 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top