रत्नागिरी-महाविद्यालयीन निवडणुका सुरू करण्याचा विचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-महाविद्यालयीन निवडणुका सुरू करण्याचा विचार
रत्नागिरी-महाविद्यालयीन निवडणुका सुरू करण्याचा विचार

रत्नागिरी-महाविद्यालयीन निवडणुका सुरू करण्याचा विचार

sakal_logo
By

21386ः संग्रहीत
...
महाविद्यालयीन निवडणुका सुरू करण्याचा मानस

मंत्री सामंत; महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनसोबत सकारात्मक प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः विद्यापीठ आणि महाविद्यालय विद्यार्थी (युनियन) निवडणुका सुरू करण्याबाबत गृहमंत्री आणि इतर संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या (मासू) शिष्टमंडळाला दिले आहे. तसेच विद्यापीठ पदवीधर अधिसभा (सिनेट) सदस्यांची संख्या १० वरून १६ करण्याबाबत विद्यापीठ कायद्यात अपेक्षित बदल सूचवले आहेत. राज्य विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊन कक्ष स्थापन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात फेब्रुवारीमध्ये मंत्री सामंत यांनी विद्यार्थी संवाद आयोजित केला होता. त्या वेळी यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी मासू संघटनेने ३४ प्रश्न उपस्थित करून वेळ मागितला होता. त्यानुसार मंत्री सामंत यांनी मुंबईत बैठक घेतली. मासूच्या शिष्टमंडळाने या बैठकीदरम्यान विद्यार्थीहिताच्या विविध मागण्या तसेच अनेक मूलभूत प्रश्न यावर विस्तृत चर्चा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर केली. या बैठकीचे नेतृत्व मासूचे कार्याध्यक्ष अॅड. सुनील देवरे व राज्य सचिव अरुण चव्हाण यांनी केले.
..
चौकट
वकील विद्यार्थ्यांना मासिक ५ हजार वेतन..
सर्व अकृषि विद्यापीठात स्वतंत्र विधी विभागाची स्थापना करण्यात येण्याच्या प्रश्नावर मंत्री महोदयांनी तत्काळ सर्व विद्यापीठांनी विधीविभाग कार्यान्वित करावा, हे पत्राद्वारे विद्यापीठांना कळवावे, अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली. नवीन वकील झालेल्या विद्यार्थ्यांना केरळ व कर्नाटकाच्या धर्तीवर मासिक ५ हजार रुपये वेतन सुरू करण्यात यावे, याबाबत विभाग संबंधितांशी चर्चा करून किती वेतन देता येईल, यावर निर्णय जाहीर करतील. बैठकीमध्ये कोकण विद्यापीठ व स्वतंत्र विधी विद्यापीठ निर्माण करण्यात यावे, या मागणीवरसुद्धा चर्चा करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57587 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top