राजापूर-रस्ता खोदकामासाठी वाहतूक बंद, रुग्णांची गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-रस्ता खोदकामासाठी वाहतूक बंद, रुग्णांची गैरसोय
राजापूर-रस्ता खोदकामासाठी वाहतूक बंद, रुग्णांची गैरसोय

राजापूर-रस्ता खोदकामासाठी वाहतूक बंद, रुग्णांची गैरसोय

sakal_logo
By

-rat12p39.jpg
L21378
- राजापूर ः मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्याशी चर्चा करताना भाजपा तालुकाधक्ष अभिजित गुरव, अरविंद लांजेकर.
----------
रस्ता खोदाईमुळे वाहतूक बंद, भाजप आक्रमक

राजापुरात रुग्णांची गैरसोय; नगरपालिका प्रशासन धारेवर; एकेरी वाहतूक केली सुरू
राजापूर, ता. १२ ः शहरातील तालीमखाना ते जवाहर चौक या मुख्य रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करत रस्ता बंद केल्याप्रकरणी राजापूर तालुका भाजपाने गुरुवारी (ता. १२) आक्रमक पवित्रा घेतला. रस्ता बंद केल्याने रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात येणेही अशक्य झाल्याने भाजप तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्याशी चर्चा करत या ठिकाणी दुचाकी, रिक्षा यांसाठी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्याची मागणी केली. अखेर पालिका प्रशासनाने ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी तत्काळ या ठिकाणी रिक्षा व दुचाकीसाठी एकेरी वाहतूक सुरू करण्याबाबत नियोजन केले.
शहरातील जकातनाका ते जवाहरचौक या मुख्य रस्ताच्या रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यालगत असलेल्या पाणीपुरवठा वाहिनीच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे; मात्र हे काम करत असताना पालिका व संबंधित ठेकेदाराने वाहतुकीबाबत योग्य नियोजन न केल्याने ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. रुग्णांना ने-आण करणारी रुग्णवाहिकाही अर्धा कि.मी. लांबवर थांबवली जात आहे. एसटी वाहतूकही पूर्णपणे बंद आहे.
..
चौकट
मुख्याधिकारी भोसले तत्काळ दाखल
याबाबत भाजपा तालुकाध्यक्ष गुरव यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मुख्य रस्त्यावर जात नगरपालिका प्रशासनाला जाब विचारला. या वेळी मुख्याधिकारी भोसले हेदेखील तत्काळ या ठिकाणी दाखल झाले. गुरव यांनी वस्तुस्थितीची माहिती मुख्याधिकारी यांना दिली. रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन किमान एकेरी वाहतूक सुरू करून रिक्षा व दुचाकी यांना ये-जा करण्यास जागा करावी, अशी मागणी केली. तशा सूचना मुख्याधिकारी भोसले यांनी संबंधित ठेकेदाराला दिली आणि तत्काळ तशी वाहतूक सुरू करण्यात आली.
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57593 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top