
रत्नागिरी ः धान्य वितरणाचे 41 ट्रक जीपीएसवर
-rat12p36.jpg
L21369
ः रत्नागिरी ः जिल्हा पुरवठा विभागातून जीपीएस यंत्रणेद्वारे धान्यपुरवठा करणाऱ्या वाहनांवर असे लक्ष ठेवता येते.
-------------
४१ ट्रक जीपीएसवर; करडी नजर धान्य वितरणवर
पुरवठा विभागाकडे नियंत्रण; साडेपाच हजार टन धान्य महिन्याला वितरित
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः जिल्ह्यातील धान्यांची वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार, जिल्हा पुरवठा विभागाचे ४१ ट्रक आता ''ग्लोबल पोझिशन सिस्टिम'' (जीपीएस) यंत्रणेवर आहेत. ठरवून दिलेल्या मार्गावर हे ट्रक धान्य वितरण करत असून पुरवठा विभाग त्यांच्यावर नियंत्रण ठेवून आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत दिलेल्या वेळ आणि मार्गावरून हे ट्रक जात असल्याने महिन्याला साडेपाच हजार टन धान्य वितरण सुरळीत सुरू असल्याचे पुरवठा विभागाने सांगितले.
पोषण आहारातील गैरप्रकार टाळण्यासाठी आणि धान्य वितरण व्यवस्थेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी राज्यातील प्रत्येक जिल्हा पुरवठा विभागाला विशेष सूचना केल्या आहेत. धान्य वितरण व्यवस्थेमध्ये कोणतीही अनियमितता येऊ नये, यासाठी धान्य वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनावर जीपीएस यंत्रणा बसवण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार येथील जिल्हा पुरवठा विभागाचा आढावा घेतला असता, जिल्हा पुरवठा विभाग गेल्या काही वर्षांपासूनच सतर्क आहे. पुरवठा विभागाने नियमित धान्य वाहतूक करणाऱ्या २२ ट्रकवर जीपीएस यंत्रणा बसवली आहे तर जादा लागणाऱ्या ट्रकना त्या-त्या वेळी ही यंत्रणा लावून ती अॅक्टिवेट केली जाते. जिल्ह्यात आजच्या घडीला ४१ धान्य वाहतूक ट्रकांना जीपीएस यंत्रणा बसवली आहे.
या जीपीएस यंत्रणेचे नियंत्रण जिल्हा पुरवठा विभागाकडे आहे. जिल्हा पुरवठा विभाग प्रत्येक वाहनांचे लोकेशन काय, त्यांना दिलेल्या रुटवरच ते आहेत का, वेळेत पोहचले आहेत का, आदींची माहिती पुरवठा विभागात एका क्लिकवर मिळते.
...
मार्ग सोडल्याची वा विलंबाची तक्रार नाही
जिल्हा पुरवठा विभाग दर महिन्याला सुमारे १२ हजार ४६३ टन गहू व तांदूळ याचे वितरण करते. यामध्ये ५ हजार २१८ टन गहू तर ७ हजार २४५ टन तांदळाचा समावेश आहे. जीपीएस यंत्रणेमुळे प्रत्येक वाहनावर बारीक नजर ठेवता येते. वितरण व्यवस्थाही सुरळीत सुरू आहे. आजपर्यंत मार्ग सोडल्याची किंवा विलंब झाल्याची कोणतीही तक्रार नसल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
-------------------------
गहू* तांदूळ
मोफत धान्य*२४१८ टन*३५४५टन
नियमित धान्य*२८०० टन*३७०० टन
एकूण*५ हजार २१८*७२४५ टन
------------------------------------------------------
एकूण*१२ हजार ४६३ टन धान्य वितरित
-----------------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57595 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..