
''नवीन दशावतार मंडळाचा पिकुळेत उद्या प्रारंभ
नवीन दशावतार मंडळाचा
पिकुळेत उद्या प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
साटेली भेडशी, ता. १२ः पिकुळे-लाडाचेटेंब येथे धालोत्सव ग्रामस्थ मंडळ, महिला बचतगट व (कै.) रामा रत्नू गवस सेवाभावी प्रतिष्ठान यांच्या वतीने नव्याने येत असलेल्या सिध्दिविनायक दशावतार नाट्यमंडळाचा प्रारंभ शनिवारी (ता. १४) सायंकाळी सात वाजता आयोजित केला आहे. तर रात्री आठ वाजता नामवंत दशावतार संचातील कलाकारांचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी प्रशासकिय अधिकारी तथा सिडको सल्लागार मोहन गवस उपस्थित राहणार आहेत. तसेच सरपंच दीक्षा महालकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश गवस, पिकुळे हायस्कूलच्या मुख्याध्यापक स्नेहल गवस, कोनाळकट्टा हायस्कूलचे मुख्याध्यापक संतोष घोगळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, माजी सभापती दयानंद धाऊसकर, अॅड. सोनू गवस, संतोष नानचे, प्रवीण परब, सुहास देसाई, वासुदेव नाईक, पांडुरंग गवस, लवू नाईक, सुभाष लोंढे, शंकर जाधव, संदीप गवस आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन नाट्यमंडळाचे संचालक फटी गवस व अमित गवस यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57597 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..