
चिपळूण ः चिपळूणसह रत्नागिरीत हलका पाऊस
- rat12p34.jpg
2L21372
- रत्नागिरी ः बागायतदार तुकाराम घवाळी यांच्या बागेत आंब्याची तोड करताना कामगार.
..
- rat12p35.jpg
21373
- रत्नागिरी ः आंबा क्रेटमध्ये भरण्याचे काम वेगाने सुरू आहे.
-------------
चिपळूणसह रत्नागिरीत पावसाचा शिडकावा
''असनी''चा परिणाम; दिवसभर ढगाळ हवामान
रत्नागिरी/चिपळूण, ता. १२ ः बंगालच्या उपसागरातील असनी चक्रीवादळाने आपला मार्ग बदलला असला तरीही त्याचे अल्पसे परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवत आहेत. चिपळूणसह रत्नागिरी परिसरात हलका पाऊस झाला; मात्र दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत.
गेले दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे. गुरुवारी (ता. १२) सकाळपासून आभाळ भरून आले होते. रत्नागिरी शहर परिसरासह हातखंबा, जाकादेवी, फणसवळेसह आजूबाजूच्या भागांमध्ये हलका पाऊस पडला. चिपळूण तालुक्यात सलग दोन पावसाने हजेरी लावली. त्यानंतर दिवसभर वातावरण ढगाळ होते. मंगळवारी रात्री खेर्डी, पोफळी, पेढांबे, सावर्डे, शिरगाव, अलोरे परिसरात रिमझिम पाऊस झाला होता. या पावसाचा मोठा परिणाम आंबा बागायतीवर होणार नाही, असे बागायतदारांकडून सांगितले जात आहे. जिथे मोठा पाऊस झाला असेल, तिथे अॅथ्रॅक्सनोजचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढे पावसाची शक्यता आहे. मुसळधार पाऊस झाला तर झाडावरील फळ खराब होण्याच्या शक्यतेने बागायतदारांकडून आंबा तोड वेगाने केली जात आहे. झाडावरील बहुतांश माल काढून बाजारात किंवा कॅनिंगला दिला जात आहे. डागी किंवा कोवळा आंबा कॅनिंगसाठी देण्यात येतोय. कॅनिंगला किलोला ३२ रुपये असणारा दर त्यामुळे पुढील दोन दिवसांत २५ ते २८ रुपयांवर येण्याची शक्यता आहे. वाशी बाजारातील आंब्याची आवक वाढल्याने दर खाली आले आहेत. पाच डझनच्या चांगल्या पेटीला १९०० रुपये दर मिळत आहे.
---
कोट
रत्नागिरीत काही भागात हलका पाऊस झाला. त्याचा मोठा परिणाम हापूसवर होईल, असे नाही; परंतु तोड वेगाने चालू झाली आहे.
- देवेंद्र झापडेकर, आंबा बागायतदार
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57611 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..