पावस-टेम्पो-दुचाकीच्या धडकेत भाऊ ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-टेम्पो-दुचाकीच्या धडकेत भाऊ ठार
पावस-टेम्पो-दुचाकीच्या धडकेत भाऊ ठार

पावस-टेम्पो-दुचाकीच्या धडकेत भाऊ ठार

sakal_logo
By

-rat12p40.jpg
21397
- पावस ः टेम्पोवर आदळलेली दुचाकी.
--------------------
टेम्पो-दुचाकीच्या धडकेत भाऊ ठार; बहिणी गंभीर जखमी

दुचाकीवरून पावस बसस्थानकावर बहिणींना सोडतेवेळी अपघात
पावस, ता. १२ ः बहिणींना बसस्थानकावर सोडण्यासाठी जात असताना दुचाकीची टेम्पोला धडक बसून झालेल्या अपघातात स्वार जागीच ठार झाला, तर दोघी बहिणी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीपक परशुराम जोशीलकर (१६, मूळ रा. बेळगाव, सध्या रा. कुर्धे-सडा, रत्नागिरी) असे मृत स्वाराचे नाव आहे. रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील कुंभारघाटी येथे गुरुवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
दीपक याचे कुटुंब सेंट्रिंगच्या कामासाठी पावस येथे आले आहेत. वडील सकाळी कामावर निघून गेल्याने दीपक आपल्या बहिणी प्रियांका (२४) आणि राणी (२०) यांना सोडण्यासाठी दुचाकीवरून पावस बसस्थानकावर निघाला होता. पावस येथील कुंभारघाटीत तो आला असता, समोरून मॅक्झिमो टेम्पो आला आणि दुचाकी समोरून जाऊन टेम्पोवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, दीपक याच्या डोक्याला जबरदस्त मार बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रियांका व राणी या दोन बहिणींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर पावस दूरक्षेत्राच्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
-------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57612 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top