बरेगार यांचे उपोषण आश्वासनानंतर स्थगित आश्वासनानंतर स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बरेगार यांचे उपोषण आश्वासनानंतर स्थगित
आश्वासनानंतर स्थगित
बरेगार यांचे उपोषण आश्वासनानंतर स्थगित आश्वासनानंतर स्थगित

बरेगार यांचे उपोषण आश्वासनानंतर स्थगित आश्वासनानंतर स्थगित

sakal_logo
By

बरेगार यांचे उपोषण आश्वासनानंतर स्थगित
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ः खोटे व बनावट कागदपत्र तयार करून बोगस बदली पास दिल्याप्रकरणी माणगाव येथील तत्कालीन वनपालावर गुन्हा दाखल करण्याची ग्वाही कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिल्याने जयंत बरेगार यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण मागे घेतले.
माणगाव येथील तत्कालीन वनपालाकडून खोटे व बनावट कागदपत्र तयार करून बदली पास देण्यात आले होते. हा प्रकार बरेगार यांनी माहितीच्या अधिकारातून बाहेर काढत संबंधित वनपालावर कारवाई करा, अशी मागणी लावून धरली होती; मात्र याप्रकरणी वनविभागाकडून हात झटकण्यात आले. त्यानंतर श्री. बरेगार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत कुडाळ पोलिसात याप्रकरणी तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती; मात्र गेले वर्षभर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली जात होती. आज अखेर पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण छेडताच संबंधित वनपालावर गुन्हा दाखल करण्याची ग्वाही त्यांना कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली. त्याआधी श्री. बरेगार यांनी मेलद्वारे पोलिस अधीक्षक व कुडाळ पोलिस ठाणे यांना उपोषणाची कल्पना दिली होती; मात्र संबंधित ओरोस परिसरामध्ये पोलिस अधीक्षक कार्यालय येत असल्याने त्याठिकाणी कल्पना दिली नसल्याचा ठपका ठेवत श्री. बरेगार यांना उपोषण स्थळावरून ओरोस पोलिसात नेण्यात आले. तेथे कायदेशीर नोटीस बजावत सायंकाळी त्यांना सोडण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57614 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top