अभ्यंकर यांचे कुडाळात राष्ट्रवादीतर्फे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभ्यंकर यांचे कुडाळात
राष्ट्रवादीतर्फे स्वागत
अभ्यंकर यांचे कुडाळात राष्ट्रवादीतर्फे स्वागत

अभ्यंकर यांचे कुडाळात राष्ट्रवादीतर्फे स्वागत

sakal_logo
By

21399
कुडाळ ः ज. मो. अभ्यंकर यांच्याकडे निवेदन देताना दीपक जाधव, अमित सामंत, बाबा खतीब आदी.

अभ्यंकरांचे कुडाळात
राष्ट्रवादीतर्फे स्वागत
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १२ ः अनुसूचित जाती जमाती आयोगाचे राज्याध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचे राष्ट्रवादी काँगेसच्या सामाजिक न्याय विभागातर्फे जिल्ह्यात स्वागत करण्यात आले. दोन मागण्यांचे निवेदनही पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आले.
श्री. अभ्यंकर जिल्हा दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुडाळ रेल्वेस्थानकावर पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच पक्षाच्या सिंधुदुर्ग सामाजिक न्याय विभागातर्फे प्रमुख दोन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अनुसूचित जाती-जमातींना देण्यात येणारे जातीचे दाखले कुठलीही जाचक अट न ठेवता सरळ तलाठी पंचयादीवर देण्यात यावेत व विकास महामंडळाकडून रोजगारासाठी कर्जाचे अनुदान पाचपट व्हावे, या आशयाचे निवेदन जिल्हाध्यक्ष दीपक जाधव यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष बाबा खतीब, कार्याध्यक्ष नाझीर शेख, कुडाळ तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे, विद्यार्थी विभाग प्रमुख प्रतीक सावंत आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57615 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top