केरमध्ये हत्तींचा धुडगूस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केरमध्ये हत्तींचा धुडगूस
केरमध्ये हत्तींचा धुडगूस

केरमध्ये हत्तींचा धुडगूस

sakal_logo
By

21398
केर ः हत्तींनी येथे गुरुवारी उद्‍ध्वस्त केलेले माड.
केरमध्ये हत्तींचा धुडगूस
साटेली भेडशी, ता. १२ : मोर्लेमधून केरमध्ये परतलेल्या पाच हत्तींच्या कळपाचा मुक्काम दोन रात्री केर गावातील जंगल परिसरात आहे. आज सकाळीही ते त्याच भागात असल्याची माहिती मिळाली. दोन दिवसांच्या मुक्कामात हत्तींनी वस्तीलगतच्या फणसांवर ताव मारला आणि शेतकऱ्यांच्या माड, कवाथे व बांबूंचे नुकसानही केले. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. केरमधून मोर्लेत गेलेला हत्तींचा कळप मंगळवारी पुन्हा मोर्लेतून केरमध्ये पोचला. तेथे त्यांनी वस्तीलगतच्या फणसाच्या झाडावरील फणस खाली पाडले. त्यातील काही खाल्ले तर इतरांचे नुकसान केले. कवाथे सोंडेने ओढल्याने तर माड ढकलून जमीनदोस्त केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या कळपात दोन मोठे हत्ती व तीन पिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57616 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top