मालवणात शनिवारपासून कोंकणी परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात शनिवारपासून कोंकणी परिषद
मालवणात शनिवारपासून कोंकणी परिषद

मालवणात शनिवारपासून कोंकणी परिषद

sakal_logo
By

swt१२२३.jpg
21400
मालवणः येथे होणाऱ्या कोंकणी परिषदेच्या ३२ व्या अधिवेशनाची माहिती परिषदेच्या अध्यक्षा उषा नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालवणात उद्यापासून कोंकणी परिषद
उषा नाईक यांची माहिती; गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १२ ः अखिल भारतीय कोंकणी परिषदेचे ३२ वे अधिवेशन धुरीवाडा येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे १४ व १५ मे रोजी होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. दोन दिवसांच्या या अधिवेशन काळात विविध पुस्तकांचे प्रकाशन, ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार, परिसंवाद, कवि संमेलन यासह अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले आहे, अशी माहिती परिषदेच्या अध्यक्षा उषा नाईक यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी परिषदेचे सचिव गौरीश वेर्णेकर, रुजारिओ पिंटो, रेनॉल्ड भुतेलो आदी उपस्थित होते. श्रीमती नाईक म्हणाल्या, ‘‘कोंकणी अधिवेशनाचे उद्घाटन १४ ला सकाळी दहा वाजता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो, आमदार वैभव नाईक, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, ज्येष्ठ लेखक अरूण उभयकर, श्रीमती सुफला गायतोंडे आदी उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी दुपारी साडे बारा ते दीड यावेळेत गोवा सरकार प्रशासन आणि केंद्रीय आस्थापनांत कोंकणी भाषेचा वापर, स्थिती आणि कृती या विषयावर परिसंवाद होणार आहे. दुपारी तीन ते साडे चार यावेळेत कवि संमेलन होणार आहेत. साडे चार ते साडे पाच यावेळेत गोवा, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्रातील कोंकणी शिक्षण या विषयावर चर्चासत्र असेल. साडे सहा ते साडे आठ यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. १५ ला सकाळी साडे नऊ ते साडे दहा यावेळेत घाटमाथ्यावरील कोंकणी भाषा आणि संस्कृती यांचे संवर्धन या विषयावर चर्चासत्र होईल. साडे दहा ते साडे अकरा यावेळेत ज्येष्ठांचे कवि संमेलन होणार आहे. यात जिल्ह्यासह गोव्यातील कवि सहभागी होणार आहेत. साडे अकरा ते साडे बारा यावेळेत कोकणातील किनारपट्टी भागातील कला, व्यवसाय या विषयावर परिसंवाद होणार आहे. दुपारी अडीच ते साडे तीन यावेळेत या अधिवेशनाचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमास अरूण उभयकर, हेमा नाईक, व्हिंक्टर डांटस, रेनॉल्ड भुतेलो, जेम्स फर्नांडिस आदी उपस्थित राहणार आहेत.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57617 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top