रत्नागिरी-क्रेडाईच्या कोकण वास्तू प्रदर्शनाचे आज उदघाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-क्रेडाईच्या कोकण वास्तू प्रदर्शनाचे आज उदघाटन
रत्नागिरी-क्रेडाईच्या कोकण वास्तू प्रदर्शनाचे आज उदघाटन

रत्नागिरी-क्रेडाईच्या कोकण वास्तू प्रदर्शनाचे आज उदघाटन

sakal_logo
By

क्रेडाईच्या कोकण वास्तू प्रदर्शनाचे आज उदघाटन
रत्नागिरी, ता. १२ ः रत्नागिरी क्रेडाईतर्फे कोकणातील पहिलेवाहिले ''कोकण वास्तू प्रदर्शनानाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. १३) सकाळी साडेअकरा वाजता प्रसिद्ध उद्योजक किरण सामंत यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी बी. एन. पाटील उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस येथील हॉटेल विवेक (माळनाका) येथे हे वास्तू प्रदर्शन असणार आहे.
कोकण वास्तू वातानुकूलित प्रदर्शनात रत्नागिरी शहर तसेच ग्रामीण भागातील म्हणजेच रेल्वेस्टेशन, कुवारबाव, डीमार्टपासून, रत्नागिरी शहर, समुद्रदर्शन, ७, ११, १४ मजली टॉवर्स, मारुती मंदिरपासून जवळ अशा अनेक ठिकाणचे रेसिडेन्शिअल तसेच प्लॉटिंगचे प्रोजेक्ट व प्रत्येक प्रोजेक्टची वेगवेगळी वैशिष्ट्ये आपण एकाच ठिकाणी पाहू शकणार आहोत. रत्नागिरी क्रेडाईतर्फे कोकण वास्तूप्रदर्शनात ब्लॉक बुक करणाऱ्या ब्लॉकधारकाला स्टॅम्पड्युटीमध्ये ३ टक्के सवलत तसेच एसबीआयचे कर्ज घेतल्यास प्रोसेसिंग फी माफ आणि इतर अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. या सर्वांचा इच्छुक ब्लॉकधारकांनी लाभ घ्यावा. तसेच महारेरापासून अनेक मान्यताप्राप्त प्रोजेक्टमध्ये आपला ब्लॉक बुक करावा, असे आवाहन क्रेडाई रत्नागिरीतर्फे करण्यात येत आहे. सकाळी दहा ते रात्री ९ वाजेपर्यंत वास्तुप्रदर्शन खुले राहणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन क्रेडाईचे अध्यक्ष नित्यानंद भुते, जॉईन सेक्रेटरी दीपक साळवी, सेक्रेटरी रुपेश साळवी, उपाध्यक्ष राजेश शेट्ये आदींनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57622 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top