
स्वातंत्र्यवीर सावरकरांना रत्नागिरीत अभिवादन
rat१२p१.jpg
२१२४२
रत्नागिरीः स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बंधमुक्ततेचा दिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी विचारप्रणाली संस्थेने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य असलेल्या रत्नागिरी विशेष कारागृहातील कोठडीला भेट दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना रत्नागिरीत अभिवादन
बंधमुक्ततेचा दिवस ; अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी संस्थेचे ४० जण सहभागी
रत्नागिरी, ता. १३ : दहा मे १९३७ हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संपूर्ण बंधमुक्ततेचा दिवस. हाच योग साधून सामाजिक संस्था अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी विचारप्रणाली संस्थेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य असलेल्या रत्नागिरी येथे दोन दिवसाच्या सहलीचे आयोजित करण्यात आले. यामध्ये अगदी ४ वर्षाच्या लहानग्यांपासून ६० वर्षेपर्यंत जवळपास ४० सावरकरप्रेमींनी पांढरे कपडे, भगवा शेला आणि भगवी टोपी या संस्थेच्या पेहरावात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना रत्नागिरी येथील विशेष कारागृहातील ज्या कोठडीत ठेवले होते, त्या कोठडीला पहिल्या दिवशी त्यांनी भेट दिली. त्या कोठडीत स्वातंत्र्यवीर सावरकरांना जो सश्रम कारावास भोगावा लागला, त्याचे संपूर्ण चित्र तेथील जेलर अमेय पोतदार यांनी सर्वांपुढे उभे केले. त्यानंतर स्वा. सावरकरांच्या जीवनावर एक लघुपट दाखवण्यात आला. श्री. पोतदार व त्यांचे सहकारी सावरकर प्रेमींना करत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा संस्थेतर्फे सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले. त्यांच्या या कार्यात संघटना त्यांच्या नेहमीच बरोबर राहील असे अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी सांगितले.
त्यानंतर शिरगाव येथील हनुमान मंदिरात सामुहिक हनुमान चालीसा पठण केले. तिथून जवळच असलेल्या दामले कुटुंबीयांच्या घराला भेट दिली. रत्नागिरीत प्लेगची साथ आल्यावर स्वा. सावरकर काही दिवस याच वास्तूत मुक्कामाला होते. सावरकरांची खोली दामले कुटुंबीयांनी आजही तशीच जतन करून ठेवली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्याची संपूर्ण माहिती दामले कुटुंबीयांना सांगितली. त्यांनतर दामले कुटुंब आणि त्यांचे बंधू श्री. देसाई यांनी सावरकरच्या अनेक आठवणी सांगितल्या. दामले कुटुंबीयांचाही संस्थेतर्फे आदरपूर्वक सत्कार करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी सकाळी पटवर्धन प्रशालेच्या चौकात असलेल्या स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जोरदार घोषणाबाजी झाली. सावरकरांनी उभारलेल्या पतितपावन मंदिरात सदस्यांनी लक्ष्मी-विष्णू तसेच गाभाऱ्यातील भारत मातेच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन एकत्रित रामरक्षा स्तोत्र व मारुती स्तोत्र पठण केले. सिंधू नदीस भारतात आणून अखंड हिंदुस्थानची पुन:निर्मिती व्हावी यासाठी प्रार्थना केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57628 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..