३ मस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३ मस्ट
३ मस्ट

३ मस्ट

sakal_logo
By

राज्यपाल कोश्यारी आज दापोलीत

सुवर्ण पालवी महोत्सवाचे करणार उदघाटन; कृषी महोत्सवासह परिसंवाद
दाभोळ, ता. १२ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सुवर्ण पालवी कृषी महोत्सवाचे उद्घाटन १३ मे रोजी सकाळी ११ वा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम सर विश्वेश्वरैया सभागृहात होईल.
शुक्रवारी (ता. १३) ११ ते दुपारी १ वा. उद्घाटन कार्यक्रम होईल. या वेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री अनिल परब, भटके विमुक्त व अर्धभटक्या जातीजमाती कल्याण आणि विकासबोर्डाचे अध्यक्ष दादा इदाते, आमदार नीतेश राणे, आमदार योगेश कदम, आमदार शेखर निकम, कुलगुरू डॉ. संजय सावंत आदी उपस्थित राहणार आहेत. याच ठिकाणी कृषी महोत्सव व कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. सकाळी ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत आंबा व फळप्रदर्शन, दुपारी २ ते सायं. ५ वाजतेपर्यंत शिवारफेरी, दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत कोकणातील सेंद्रिय शेती आणि भविष्यकालीन दिशा या विषयावर परिसंवाद, सायं. ६ ते रात्री ९ मनोरंजनाचे कार्यक्रम होतील. शनिवारी (ता. १४) सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत आंबा व फळप्रदर्शन, सकाळी १० ते दुपारी १ बांबू लागवड आणि प्रक्रिया, शासकीय योजना आणि अनुदान, सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान, शोभिवंत मत्स्यशेती या विषयावर परिसंवाद. सकाळी ११ ते सायं. ५ या कालावधीत पुष्पप्रदर्शन, शिवारफेरी आणि सायं. ६ ते रात्री ९ मनोरंजनाचा कार्यक्रम होतील. १५ मे रोजी नाचणी खाद्यपदार्थ स्पर्धा व प्रदर्शन, १६ मे रोजी तांदूळ खाद्यपदार्थ स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्‍यांनी आपली नावे १३ मे रोजी सायं. ५ वाजेपर्यंत डॉ. पूजा सावंत, शिल्पा जोशी, डॉ. स्नेहा तोरणे यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57644 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top