५ मस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

५ मस्ट
५ मस्ट

५ मस्ट

sakal_logo
By

राजिवडा येथील तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी ः शहरातील राजिवडा येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मोहिन गल्लीक मुजावर (वय १९, रा. राजिवडा, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १२) सकाळी अकराच्या सुमारास निदर्शनास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी मोहिन बराच वेळ घरातून बाहेर आला नाही, म्हणून त्याचे नातेवाईक त्याला पाहण्यासाठी आतील खोलीत गेले असता मोहिन हा घराच्या सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. त्याचा भाऊ मुस्तकी मुजावर याने तत्काळ शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.
------
गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी ः तालुक्यातील सोमेश्वर-मडकेवाडी येथे तरुणाने फणसाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रूपेश गोविंद मडके (वय ३५, रा. मडकेवाडी, सोमेश्वर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ११) रात्री साडेनऊच्या सुमारास निदर्शनास आली. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत त्याचा पुतण्या दुर्गेश नीलेश मडके (वय १९, रा. सोमेश्वर, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार बुधवारी रात्री रूपेश मडके यांच्या पत्नीने दुर्गेश याला फोन करून रूपेश फणसाच्या झाडावर चढले होते. ते अजून खाली उतरले नसल्याची माहिती दिली. तेव्हा दुर्गेशने घराच्या पाठीमागील बाजूस जाऊन पाहिले असता, त्याला रूपेश फणसाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. याबाबत ग्रामीण पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल सावंत करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57645 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top