देवगड उद्यान रस्ता पुन्हा वादात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगड उद्यान रस्ता पुन्हा वादात
देवगड उद्यान रस्ता पुन्हा वादात

देवगड उद्यान रस्ता पुन्हा वादात

sakal_logo
By

swt1228.jpg
21427
देवगड ः येथील पवनचक्की भागात जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता.

देवगड उद्यान रस्ता पुन्हा वादात
तिढा कायम ः पोलिसांच्या मध्यस्थीने तूर्त खुला
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १२ः येथील पवनचक्की परिसरातील देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या उद्यानाकडे जाणार्‍या रस्त्याच्या जागेबाबतचा प्रश्‍न आज पुन्हा एकदा ऐरणीवर आला. मार्गाच्या जागेचा तिढा अद्याप सुटला नसल्याने खासगी जागा असल्याचा दावा करीत संबधितांकडून मार्ग बंद करण्यात आला होता; मात्र नगरपंचायत प्रशासनासह पोलिसांकडून चर्चा होऊन अखेर मार्ग खुला करण्यात आला. यावेळी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.
येथील पवनचक्की परिसरात समुद्रालगतच्या उतारावरील भागात देवगड जामसंडे नगरपंचायतीने उद्यान तयार केले आहे. या भागात जाण्यासाठी डांबरी मार्ग आहे. अलीकडे उद्यानामध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली होती. उद्यानाचा भाग नगरपंचायतीचा असल्याने तेथे विकास करण्यात आला; मात्र या भागाकडे जाणारा रस्ता खासगी जागेतून जात असल्याचा दावा करीत आज सकाळी पुन्हा एकदा संबधितांकडून काठ्या, पत्रे लावून मार्ग बंद करण्यात आला. यापूर्वीही गेल्या महिन्यात याच कारणावरून मार्ग बंद केला होता; मात्र नगरपंचायतीने त्यावर चर्चा घडवून आणल्यानंतर मार्ग खुला झाला होता. आज पुन्हा मार्ग बंद केला गेल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाला मिळताच नगराध्यक्षा साक्षी प्रभू, नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी, संतोष तारी, रोहन खेडेकर, विशाल मांजरेकर, नितीन बांदेकर, तेजस मामघाडी यांच्यासह नगरपंचायत प्रशासनाने तेथे जाऊन संबंधित जागा मालकांशी चर्चा केली. यावेळी पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संबंधित जागा मालकांशी संवाद साधण्यात आला. या भागाकडे जाणार्‍या जागेच्या अनुषंगाने चर्चा झाली. अखेर जागा निश्‍चितीच्या अनुषंगाने चर्चा होऊन रस्ता खुला करण्यात आला. दरम्यान, नगरपंचायत उद्यानाकडे जाणारा मार्ग खुला झाल्याने परिसरात व्यवसाय करणार्‍यांनी तसेच पर्यटकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला.
..................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57657 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top