देवगडमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात भाजपची आगपाखड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात भाजपची आगपाखड
देवगडमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात भाजपची आगपाखड

देवगडमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात भाजपची आगपाखड

sakal_logo
By

सत्ताधाऱ्यांविरोधात
भाजपची आगपाखड
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १२ः येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील शिवसेना महाविकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांकडून कामे होत नसल्याबद्दल विरोधी भाजप नगरसेवकांनी आगपाखड केली. पाणीप्रश्‍न, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी समस्या, पवनचक्की उद्यानाकडील रस्ता आदी बहुतांशी समस्यांबाबत निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याने आता आंदोलन हाच पर्याय असल्याचा इशारा भाजप नगरसेवकांनी दिला. सत्ताधाऱ्यांचा नियोजनशून्य कारभार, प्रशासनावर वचक नसल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली. येथील आमदार संपर्क कार्यालयात भाजप नगरसेवकांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नगरसेवक शरद ठुकरूल, नगरसेविका प्रणाली माने उपस्थित होते. पाण्याच्या प्रश्‍नासह अन्य प्रश्‍नाबाबत वारंवार निवेदने देऊनही ठोस कार्यवाही होत नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57659 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top