समुद्री गरुडाला आचऱ्यात जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समुद्री गरुडाला आचऱ्यात जीवदान
समुद्री गरुडाला आचऱ्यात जीवदान

समुद्री गरुडाला आचऱ्यात जीवदान

sakal_logo
By

swt1229.jpg
21431
आचराः जखमी समुद्री गरुडासह युवक.

समुद्री गरुडाला आचऱ्यात जीवदान
आचरा, ता. १२ः येथील जामडूल येथे जखमी अवस्थेत असलेल्या समुद्री गरुड पक्षावर येथील युवकांनी कोकण वाईल्ड लाईफ या संस्थेच्या सहकार्याने उपचार करत नैसर्गिक अधिवासात सोडले. आचरा-जामडूल येथे समुद्री खडकांवर समुद्री गरुड हा पक्षी बराच काळ एकाच जागेवर बसून असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. येथील रहिवासी प्रथमेश आचरेकर, एकनाथ आचरेकर, ओमप्रकाश आचरेकर, अभय गोलतकर, लकी, शुभम, प्रज्वल, पारस यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढून पाणी व मासे खायला घातले. पक्षाच्या उजव्या पंखाला दुखापत झाल्यामुळे त्याला उडता येत नव्हते. पुढील उपचारासाठी त्याला कोकण वाईल्डलाईफ या संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले. त्याच्यावर उपचार करून नंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या कामात पक्षीतज्ज्ञ डॉ. मगदूम, प्राणीमित्र स्वप्नील गोसावी यांनी मदत केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57669 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top