रत्ना पान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्ना पान
रत्ना पान

रत्ना पान

sakal_logo
By

फोटो ratkhed12p2 ओळी :
२१४४०
‘जागर कदम वंशाचा’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना नेते रामदास कदम यांचा सत्कार झाला. ( सिध्देश परशेट्ये : सकाळ छायाचित्रसेवा )


रामदासभाई सेकंड इनिंग जोरदार सुरु करा
मंत्री एकनाथ शिंदे; पक्षात पुन्हा सक्रिय होण्याचा सल्ला

खेड, ता. १२ : रामदास भाई तुम्ही आता केवळ साहित्यिक बनू नका बाळासाहेबांच्या काळातील तुम्ही फायरब्रॅन्ड नेते आहात. तुमची आम्हाला आणि समाजाला गरज आहे. अनेक कठीण प्रसंगात पक्षासाठी झोकून तुम्ही काम केले आहे. तुम्ही डोक्यात काही ठेऊ नका सेकंड इनिंग जोरदार सुरु करा अशी आमची इच्छा आहे. असे प्रतिपादन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. जागर कदम वंशाचा या पुस्तक प्रकाशन सोहळ्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी मंत्री शिंदे पुढे म्हणाले की, भाई तुमची आम्हाला आणि विधीमंडळातील युवा पिढीला गरज आहे. त्यामुळे तुम्ही आता सक्रिय व्हावे
गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, ‘भाई तुम्ही आम्हाला जेष्ठ आहात तुमच्या कडून आम्हाला सदैव प्रेरणा मिळते. त्यामुळे तुम्ही विधीमंडळात येत चला. आम्हाला तुमचा नेहमीच आधार वाटतो.’
कार्यक्रमाला शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम, शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर, शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदारयोगेश कदम, जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, युवा सेनेचे सिध्देश कदम यांच्या सह सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती आजी माजी सदस्य, खेड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व कदम कुटूंबीयासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट :
सभेचे निमंत्रण पण जाणार नाही
रामदास कदम म्हणाले. मला शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप मिळालाय. मला  १४ मे च्या शिवसेनेच्या सभेचे बोलावणे आले आहे. या सभेला मी उपस्थित राहणार नाही. कारण आमच्या ग्रामदैवतेच्या उत्सवाला मला उपस्थित राहवे लागणार आहे. मात्र त्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचं रामदास कदमांनी स्पष्ट केलं.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57674 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top