
पान तीन मेन-अग्निशमन बंबांचे मालवणात लोकार्पण
21425
मालवण ः येथे अग्निशमन बंबांचे लोकार्पण करताना आमदार वैभव नाईक. (छायाचित्र ः प्रशांत हिंदळेकर)
मालवणमध्ये अग्निशमन बंब सेवेत
शिवसेनेचा पुढाकार; नगरविकास मंत्र्यांचे लक्ष वेधताच समस्येची दखल
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १२ ः येथील पालिकेला प्राप्त झालेल्या अत्याधुनिक अग्निशमन बंबांचे लोकार्पण आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. पालिकेला कायद्यात बदल करून नवा अग्निशमन बंब मिळाला; मात्र हा अग्निशमन बंब वापर न झालेलाच बरा. कुठेही आग लागून कोणाचेही नुकसान होऊ नये, अशी भावना यावेळी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली.
येथील पालिकेला प्राप्त झालेल्या अत्याधुनिक अग्निशमन बंबांचे लोकार्पण नाईक यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, यतीन खोत, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, नितीन तायशेटे, नाना पारकर, रवी तळाशिलकर, गणेश प्रभुलीकर, बाळू अंधारी, सरदार ताजर, महेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर, सेजल परब, शिल्पा खोत, पूनम चव्हाण, शिला गिरकर, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, नितीन वाळके, पंकज सादये, किरण वाळके, भाई कासवकर, नरेश हुले, सन्मेश परब, तपस्वी मयेकर, अमेय देसाई, यशवंत गावकर, प्रसाद आडवणकर, उमेश मांजरेकर आदी उपस्थित होते.
ज्या पालिकांना यापूर्वी राज्य शासनाच्या निधीतून अग्निशमन बंब दिलेला असेल तर त्यांना दुसरा बंब देता येत नाही. या शासन निर्णयामुळे येथील पालिकेला अग्निशमन बंब जीर्ण व निर्लेखित होऊनही दुसरा बंब मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. पालिकेचे उत्पन्न मर्यादित असल्याने स्व उत्पन्नातून ७० लाखापेक्षा जास्त किंमतीची अग्निशमन यंत्रणा खरेदी शक्य नव्हते. ही बाब विचारता घेता आमदार नाईक यांनी या प्रश्नी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले. शासन निर्णयात बदल करण्याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर राज्य शासनाने पूर्वीच्या निर्णयात बदल केल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, अग्निशमन बंब उपलब्ध झाल्याने शहरातील व्यापाऱ्यांनी, नागरिकांनी आमदारांचे आभार मानले.
---
चौकट
अन् पहिलाच बंब पालिकेला
जीर्ण निर्लेखीत अग्निशमन वाहने झाली असतील तर त्या पालिकांना राज्य शासन निधीतून नवीन अग्निशमन बंबसाठी निधी उपलब्धतेस शासनाने मान्यता दिली. त्या निर्णयानंतर पहिला अग्निशमन बंब येथील पालिकेस उपलब्ध झाला आहे, असे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर तसेच मुख्याधिकारी श्री. जिरगे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57675 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..