सावंतवाडी पोलिस ठाण्यासमोरील बगीचा सुकला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी पोलिस ठाण्यासमोरील बगीचा सुकला
सावंतवाडी पोलिस ठाण्यासमोरील बगीचा सुकला

सावंतवाडी पोलिस ठाण्यासमोरील बगीचा सुकला

sakal_logo
By

21472
सावंतवाडी : येथील पोलीस ठाण्याच्या समोरील करपून गेलेली हिरवळ.

पोलिस ठाण्यासमोरील बगीचा सुकला

देखभालीचा अभाव ः सावंतवाडीत प्रशासनाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः येथील पोलीस ठाण्याच्या समोरील जागेत लावलेली हिरवळ (लॉन), शोभेची झाडे देखभालीअभावी सुकून गेली आहे. गेली तीन वर्षे याकडे पोलिस प्रशासनाचे म्हणावे तसे लक्ष नसल्याने ही स्थिती पाहायला मिळत आहे.
आपले घर किंवा कार्यालय स्वच्छ आणि नीटनेटके असावे असे म्हटले जाते. हाच हेतू ठेवत सावंतवाडी पोलिस ठाण्याचे नव्या सुसज्ज इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर तत्कालीन पोलिस निरिक्षक सुनिल धनावडे यांनी इमारतीच्या समोरील मोकळ्या जागेत छोटेखानी गार्डन तयार केले होते. हे सर्व नर्सरीची माहिती असलेल्या जाणकार व्यक्तिच्या माध्यमातून केले होते. हिरवळ तयार करुन शोभेची फुलझाडेही लावण्यात आली होती. या सगळ्याची निगा राखण्यासाठी खास माणसाची नेमणूकही करण्यात आली होती. फुलझाडासांठी ठिबक सिंचन व्यवस्थाही करण्यात आली होती; मात्र त्यांची येथून बदली झाल्यानंतर या हिरवा व फुल झाडांची निगा फारशी राखली गेली नसल्याने किंबहूना त्याकडे दुर्लक्षच झाल्याचे दिसून येत आहे. पोलिस स्टेशनच्या आवारात गेल्यावर वाटणारे प्रसन्न वातावरण एकप्रकारे हरवले आहे.
सावंतवाडी पोलिस ठाण्याचे विचार करता याठिकाणी कायमस्वरुपी पोलिस निरिक्षक पद नाही. धनावडे यांच्या मागावून आलेले शशिकांत खोत यांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही. आजही तीच परिस्थिती असल्याने ही हिरवळ व फुलझाडे करपून गेली आहे. सध्या पोलीस निरीक्षक शंकर कोरे आहेत; मात्र त्यांना वारंवार इकडून तिकडे पाठविले जाते तसेच तत्काळ दुसऱ्या पोलीस स्थानकात पाठवण्याचे नियोजन देखील केले जाते. त्यामुळे त्यांचेही लक्ष हवे तसे नाही तसेच त्यांचा टप्पा निवृत्तीचा असल्याने या छोटेखानी गार्डनची निगा राखण्यासाठी आपल्या स्टापमार्फत नियोजन नसल्याचे दिसून येते.
----

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57755 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top