संक्षिप्त-1 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त-1
संक्षिप्त-1

संक्षिप्त-1

sakal_logo
By

पावसामुळे कलमठमधील
वीजपुरवठा खंडित
कणकवली ः तालुक्यात बुधवारी रात्री किरकोळ पावसाचा शिडकावा झाल्यानंतर कलमठ विभागातील वीजपुरवठा खंडित झाला. हा पुरवठा सुरू करण्यास सुमारे दोन तास लागले. त्यानंतरही रात्रभर विजेचा लपंडाव सुरू होता. विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे असे प्रकार सातत्याने घडत असून वरिष्ठ गांभीर्याने कधी घेणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. बुधवारी रात्री ८ च्या सुमारास कणकवलीसह आजूबाजूच्या भागात पावसाचा हलका शिडकावा सुरू झाला. त्यानंतर कलमठ विभागातील वीजपुरवठा साडेआठच्या सुमारास खंडित झाला. गडगडाट, वारा काहीही नसताना हा पुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा सुरू करण्यास तब्बल दोन तासांहून अधिक वेळ लागला. रात्री साडेदहाच्या सुमारास पुरवठा सुरळीत झाला, तरीही त्यानंतर सातत्याने लपंडाव सुरू होता.

सावंतवाडीत कापड प्रदर्शनाचे उद्‍घाटन
सावंतवाडी ः सोलापूर येथील भाऊराया हॅण्डलूमच्या हातमाग व यंत्रमाग कापड प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन नुकतेच सावंतवाडी शहरातील मोती तलाव श्री देव नारायण मंदिराजवळ ज्येष्ठ नागरिक सीताराम हेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन २४ मेपर्यंत सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत खुले राहणार आहे. हातकाम, वीणकाम करून तयार केलेले कापड अत्यंत चांगल्या दर्जाचे असते. हातमागावर वीणकाम करून वापरण्यायोग्य कापड केले जाते. हे कापड तयार करण्यासाठी मनुष्यबळ अधिक लागत असल्याने व विक्री दरापेक्षा उत्पादन खर्च जास्त असल्याने सध्या हातमाग कापडाची निर्मिती कमी प्रमाणात होत आहे. यामुळे या व्यवसायात आमची नवी पिढी समोर येत नसल्याची खंत प्रदर्शन प्रमुख पांडुरंग पोतन यांनी व्यक्त केली. यावेळी निवास दुस्सा, पुरुषोत्तम पोतन, मधुकर सुर्रम, श्रीकांत श्रीराम, बाळू कोडय उपस्थित होते. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या कॉटन, मधुराई कॉटन, गढवाल कॉटन, पटोला कॉटन, इरकल कॉटन, नारायण पेठ कॉटन, कांजीवरम कॉटन, मधुराई सिल्क, पटोला सिल्क साड्या, ईरकल, पटोला, मंगलगिरी, कॉटन ड्रेस मटेरियल व कापड, सोलापूर चादर, बेडशिट, नॅपकीन, सतरंजी, कॉटन परकर, पंचा, टॉवेल, वुलन चादर, दिवाण सेट, प्रिन्टेट बेडशिट, शबनम बॅग, पिलो कव्हर, कॉटन लुंगी, कुर्ता, कॉटन शर्ट, लेडीज बॅग, गाऊन, टॉप आदींवर २० टक्के सूट देण्यात येणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हिंदूराष्ट्र जागृती अभियान
सावंतवाडीः सनातन संस्थेच्यावतीने हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंड कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदू जनजागृती समितीचे प्रेरणास्थान डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण भारतात हिंदूराष्ट्र जागृती अभियान राबवले जात आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून तसेच हिंदूंमधील ब्रह्मतेज वाढवून त्यांना हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत करण्यासाठी सावंतवाडी शहरात १४ मेस सायंकाळी ३.३० वाजता भव्य हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीला गवळी तिठा येथून प्रारंभ होणार असून आत्मेश्वर मंदिर, उभाबाजार, गांधी चौक, मुख्य बाजारपेठ, मिलाग्रीस हायस्कूल ते पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी नगरपरिषद, श्रीराम वाचन मंदिर या मार्गाने जाऊन येथील बसंस्थानकाजवळ एका छोट्या सभेत रुपांतर होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57756 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top