पिंगुळीतील गंगावणे महिला मंडळ वर्धापन दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंगुळीतील गंगावणे महिला
मंडळ वर्धापन दिन उत्साहात
पिंगुळीतील गंगावणे महिला मंडळ वर्धापन दिन उत्साहात

पिंगुळीतील गंगावणे महिला मंडळ वर्धापन दिन उत्साहात

sakal_logo
By

21471
पिंगुळी ः ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी यांचा सत्कार करताना भारती रणसिंग, स्वाती सावंत.

पिंगुळीत कोरोना योद्धांचा गौरव

गंगावणे महिला मंडळाचा वर्धापन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः पिंगुळी-गुढीवाडी येथील (कै.) सौ. रोहिणी भास्कर गंगावणे महिला मंडळाचा २५ वा वर्धापन दिन ज्येष्ठ लेखिका सौ. वृंदा कांबळी याच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा झाला. प्रमुख पाहुण्यांमधून कवयित्री स्वाती सावंत उपस्थित होत्या. यावेळी इतर सत्कारांसह कोरोना योद्धांचाही सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर मंडळाच्या नूतन अध्यक्षा भारती रणसिंग, ज्येष्ठ लेखक ना. बा. रणसिंग, जिल्हा ठाकर समाजाचे अध्यक्ष भगवान रणसिंग, पिंगुळी ठाकर समाजाचे अध्यक्ष व या मंडळाचे संस्थापक भास्कर गंगावणे, उपाध्यक्ष शशांक आटक, कार्याध्यक्ष राजन रणसिंग, भद्रकाली पतपेढीचे उपाध्यक्ष सुरेश गंगावणे उपस्थित होते. रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळाने समाजाचे ज्येष्ठ लेखक रणसिंग, ज्येष्ठ लेखिका कांबळी मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सुप्रिया सिंगनाथ, संस्थापक सचिव विणा गंगावणे व माजी अध्यक्ष अश्विनी गंगावणे यांच्यासह ठाकर समाजाचे जिल्हाध्यक्ष भगवान रणसिंग, भद्रकाली पतसंस्थेचे अध्यक्ष राजन बावलेकर व उपाध्यक्ष सुरेश गंगावणे यांचा आणि गुढीवाडीतील ठाकर समाजाच्या १५ कोविड योद्धांचा सत्कार करण्यात आला.
श्री देवी भद्रकालीच्या पूजनाने तसेच (कै.) सौ. रोहिणी गंगावणे यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. गंगावणे यांनी मंडळाच्या २५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. मंडळाच्या उपक्रमांची माहिती दिली. मंडळाच्या अध्यक्षा सौ. रणसिंग यांनी प्रास्ताविक केले. स्वाती सावंत यांनी महिलांना मार्गदर्शन केले. लेखिका सौ. कांबळी यांनी महिला मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले. रणसिंग यांनी ठाकर समाजाच्या पूर्व इतिहासाबाबत माहिती दिली. जिल्हाध्यक्ष रणसिंग यांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या. मंडळाच्या सचिव सुकन्या गंगावणे यांनी सूत्रसंचालन केले. पूजा बाबलेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी दिव्या बावलेकर, भाग्यश्री पालवे, श्वेता गंगावणे, समिक्षा गंगावणे, ठुबरे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57757 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top