
संक्षिप्त
आरोस सोसायटी शिवसेनेकडे
सावंतवाडी : आरोस विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी चेअरमनपदी विजय नाईक तर व्हाईस चेअरमनपदी युवासेना सावंतवाडी तालुकाधिकारी योगेश नाईक यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे सोसायटीवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले. ग्रामस्थांनी संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या.
बिनविरोध झालेल्या निवडणुकीत नारायण मोरजकर, आनंद नार्वेकर, हरिश्चंद्र नाईक, संतोष पिंगुळकर, गुरुनाथ नाईक, शिवाजी परब, केशव नाईक, नर्मदा नाईक, लक्ष्मी देऊलकर, विठ्ठल शेळके, राम आरोसकर यांची संचालकपदी निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.आर.आरोंदेकर यांनी काम पाहिले. यावेळी आरोस सरपंच शंकर नाईक, आरोस तंटामुक्ती अध्यक्ष राजन नाईक, दांडेली माजी सरपंच संजू पांगम, स्मिता मोरजकर, शाखाप्रमुख तानाजी खोत, मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक, रामचंद्र ऊर्फ बाबलो नाईक, विजू नाईक, मोहन नाईक, अजित कासले, संतोष नाईक, गजानन नाईक, दत्ताराम नाईक, सिद्धेश नाईक, दादा आरोलकर, बाळा शिरोडकर, आबा माणगावकर, भाई देऊलकर, बाबी परब, विनोद ठाकूर, राम आरोसकर, रमेश आरोलकर आदी उपस्थित होते.
--
जांभवडे सोसायटी भाजपकडे
कुडाळ ः प्रतिष्ठेची असलेली जांभवडे (ता. कुडाळ) विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. विरोधकांनी अत्यंत चुरशीची केलेल्या या निवडणुकीत भाजप पुरस्कृत जांभवडे ग्रामविकास पॅनेलच्या सर्वच्या सर्व १२ उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला. या सर्व विजयी उमेदवारांचे आणि पॅनेल प्रमुख माजी पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण मडव, चिंतामणी मडव तसेच प्रचार प्रमुख आणि ग्रामपंचायत सदस्य अमित मडव यांचे अभिनंदन तालुकाध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोरये आणि आंब्रड विभागीय अध्यक्ष तथा कुपवडे सरपंच दिलीप तवटे, योगेश घाडी यांनी केले. यावेळी विजयी उमेदवार मोहन भोगले, तुकाराम जांभवडेकर, बाळकृष्ण मडव, चंद्रकांत मडव, चिंतामणी मडव, प्रविण मडव, मधुकर नाईक, रमेश सावंत, संतोष कोकरे, अमिता मडव, शाहू कदम, संतोष पावसकर उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57758 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..