
गोवेरी वाचनालयाचा वर्धापनदिन उत्साहात वर्धापनदिन उत्साहात
L२१५३८
- गोवेरी ः येथे विजेत्यांना गौरविताना मान्यवर.
गोवेरी वाचनालयाचा
वर्धापनदिन उत्साहात
विविध कार्यक्रम ः पुरस्कारांचेही वितरण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथसंग्रहालय गोवेरी आणि श्री देव सत्पुरुष कला - क्रिडा मंडळ गोवेरी यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाचा वर्धापनदिन विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन गोवेरी सरपंच दशरथ परब यांच्या हस्ते झाले. ग्रामपंचायत सदस्य आनंदी गावडे, वाचनालय अध्यक्ष सतिश गावडे, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गावडे, ग्रंथपाल धोंडी गावडे, उमेश गावडे, महेश गावडे, मोहन जाधव उपस्थित होते.
स्पर्धांमध्ये अनुक्रमे यशस्वी मुले
५० मीटर धावणे मुलगे (लहान गट) आर्यन गावडे, दिव्येश जाधव, अंकुश गावडे. ५० मीटर धावणे मुली (लहान गट) पूर्वा गावडे, स्नेहल जाधव, किमया वारंग. १०० मीटर धावणे मुलगे (मोठा गट) सुरज गावडे, पाडुरंग गावडे, साहिल गोलम. १०० मीटर धावणे मुली (मोठा गट) वेदिका गावडे, नागश्री गावडे, मनस्वी गावडे. वेशभूषा स्पर्धा
(लहान गट) खुशी राऊळ, तेजस निवतकर, विरेन सावंत. रेकॉर्ड डान्स (लहान गट गावमर्यादित) वेदिका गावडे, निधी सोनवडेकर, काव्या वारंग. जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स ः संजना पवार व दीक्षा नाईक, तन्मय आईर, सलोनी सावंत. प्रश्नमंजुषा (खुला गट) हर्षाली गावडे व वेदिका गावडे, तूषार निकम व रामचंद्र मुळीक, समिक्षा गावडे व नागश्री गावडे. संगीत खुर्ची (खुला गट) सुरज गावडे, प्रतिक्षा गावडे. वन मिनीट शो (लहान गट) पूर्वा गावडे, विस्मया मर्गज, काव्या वारंग. नेमबाजी स्पर्धा (खुला गट) तनिष्का सावंत, पूर्वा गावडे, साक्षी गावडे. बुद्धिबळ स्पर्धा (खुला गट) आदीत्य गावडे, ऋषिकेश गावडे, कौस्तुभ गावडे. स्मार्ट सुनबाई स्पर्धा ः सौ. वैदेही गावडे, अवनी निकम.
रस्सीखेच स्पर्धा
दिनेश स्पोर्टस, छत्रपती स्पोर्टस या सर्व स्पर्धाचे बक्षीस वितरण श्री सत्पुरुष मंदिरामध्ये झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतिश वाळवे ,सरपंच दशरथ परब, उपसरपंच स्वरा गावडे, गोविंद गावडे, मधुकर गावडे, एम. बी. गावडे, प्रकाश गावडे, सतिश गावडे, नंदकिशोर गावडे, एकनाथ जाधव उपस्थित होते. आदर्श विद्यार्थी पुरस्कार सुजल गावडे (शाळा नेरूर-गोवेरी ), अपर्णा भगत (शाळा नेरुर गोवेरी भगतवाडी), साक्षी गावडे (शाळा नेरूर गोवेरी) व मनोज राऊळ (शाळा नेरूर गोवेरी-भगतवाडी), आदर्श विद्यार्थी पुरस्कार हिमानी वाळवे (शाळा नेरूर गोवेरी), श्रावणी कोडसकर (शाळा नेरुर गोवेरी भगतवाडी) यांना देण्यात आला. आदर्श वाचक पुरस्कार यशवंत राऊळ यांना देण्यात आला. रात्री नाईक दशावतार नाट्य मंडळ यांचा ''कृष्ण सुदामा भेट ''हा नाट्यप्रयोग सादर झाला.
-------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57759 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..