
हुमरमळा वालावलमध्ये शुटींगसाठी प्रयत्नशील
21470
हुमरमळा वालावल ः महेश मांजरेकरांचा सत्कार करताना सरपंच अर्चना बंगे, अतुल बंगे आदी.
हुमरमळा वालावलमध्ये
शुटींगसाठी प्रयत्नशील
महेश मांजरेकर ः ग्रामपंचायतर्फे सत्कार
कुडाळ, ता. १३ ः हुमरमळा वालावल गावातील निसर्ग रम्यता व धार्मिक स्थळांनी निश्चितच मला भुरळ घातली आहे. एखाद्या मराठी सिनेमा शुटींगसाठी माझे प्रयत्न निश्चितच होतील. देश विदेशात फिरुनही एवढी निसर्ग संपत्ती पहायला मिळणार नाही, असे प्रतिपादन अभिनेते महेश मांजरेकर यांनी केले.
हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीच्यावतीने श्री. मांजरेकर यांचा सन्मान सरपंच अर्चना बंगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. मांजरेकर म्हणाले, ‘‘कोकणाबद्दल प्रेम आपुलकी आहेच; परंतु या वालावल हुमरमळा गावांबद्दल ऐकुन माहिती होते. माझे मित्र मंडळी याच गावातील असून आज वास्तव्य करुन मनमुराद या गावची मजा लुटली. इथली लोक फार प्रेमळ आहेत. या गावातील सरपंच एक महिला भगिनी असून आज भगिनी माझा सन्मान करत आहेत, याचा खूप आनंद आहे. श्री देव रामेश्वर व श्री देव लक्ष्मीनारायण मंदीर आणि सभोवतालचा परीसर पाहुन आनंद झाला. आवडलेला गाव हुमरमळा (वालावल) असा आवर्जून उल्लेख करेन.’’ यावेळी अभिनेता धनंजय मांजरेकर, हुमरमळा वालावल गावातील मुंबई येथील सीए प्रसाद देसाई, श्री देव रामेश्वर उपसल्लागार समिती अध्यक्ष अमृत देसाई, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष अतुल बंगे, पंच सदस्य सोनाली मांजरेकर, शिल्पा मयेकर, गिरीजा गुंजकर, रामदास परब, आशीर्वाद बंगे, बाळा परब, अरुण देसाई, अपुर्वा देसाई, आदीती देसाई उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57760 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..