यंग स्टार उद्यमनगर संघ ठरला विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंग स्टार उद्यमनगर संघ ठरला विजेता
यंग स्टार उद्यमनगर संघ ठरला विजेता

यंग स्टार उद्यमनगर संघ ठरला विजेता

sakal_logo
By

rat13p1.jpg
21475
रत्नागिरीः सावंत स्मृती चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत यंग स्टार उद्यमनगर संघाने विजेता ठरला असून चषक स्वीकारून असा जल्लोष केला.


यंग स्टार उद्यमनगर संघ ठरला विजेता
सावंत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा; फाईट क्लब मुरुगवडा उपविजेता
रत्नागिरी, ता. १३ : छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर (कै.) छोटू देसाई क्रिकेट ॲकॅडमीतर्फे आयोजित (कै.) निखिल राजीव सावंत स्मृती चषक टी-ट्वेंटी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात यंग स्टार उद्यमनगर संघाने फाईट क्लब मुरुगवडा संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेमध्ये चोवीस संघाने सहभाग नोंदवला होता. विजेत्या यंग स्टारला ५० हजार रुपये रक्कम व चषक, उपविजेत्या फाईट क्लबला ३० हजार रुपये व चषक देण्यात आला. बक्षीस समारंभाला रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किरण सामंत, सचिव बिपीन बंदरकर, कार्याध्यक्ष बाळू साळवी, उपाध्यक्ष दीपक देसाई, सहसचिव बलराम कोतवडेकर, बॅडमिंटन असोसिएशन अध्यक्ष प्रसन्ना आंबुलकर, राजीव सावंत आदी उपस्थित होते. अंतिम सामन्यातील सामनावीर ईशान गडकर,(यंगस्टार क्लब), उत्कृष्ट फलंदाज दीपक आडविलकर (यंगस्टार क्लब), उत्कृष्ट गोलंदाज पप्पू साळवी (यंग स्टार क्लब) , उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हमजा खलीपा (यंगस्टार क्लब), स्पर्धेतील मालिकवीर साहिल मदार (फाईट क्लब) यांनाहि ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह देवून गौरवण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57770 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top