जगबुडी नदीला लागले कचऱ्याचे ग्रहण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जगबुडी नदीला लागले कचऱ्याचे ग्रहण
जगबुडी नदीला लागले कचऱ्याचे ग्रहण

जगबुडी नदीला लागले कचऱ्याचे ग्रहण

sakal_logo
By

जगबुडी नदीला कचऱ्याचे ग्रहण
नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती; प्रशासनाचा संबंधीत विभागाचे दुर्लक्ष
खेड, ता. १३ ः तालुक्यातील जगबुडी नदीपात्राला गेल्या काही वर्षांपासून कचऱ्याचे ग्रहण लागले आहे. मानवनिर्मित कचरा नदीत फेकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच नदीपात्रात साचलेल्या वाळूच्या टेकड्यामुळे नैसर्गिक संकटदेखील गडद होत आहे. याकडे शासनाचा संबंधित विभाग मात्र ढिम्म बसून बघण्यापलीकडे कोणतीही उपाययोजना करताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जगबुडी नदीपात्रातील पाण्यावर गेल्या काही दिवसांमध्ये कचरा तरंगू लागला आहे. रात्री-अपरात्री नदीपत्रात फेकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे पात्र प्रदूषित होत आहे. हे प्रकार खेड शहरातून व भोस्ते, अलसुरे गावातून घडत असले तरी नगर पालिका अथवा ग्रामपंचायत प्रशासन मात्र कारवाईसाठी पुढे येताना दिसत नाही. जगबुडी नदीपात्रातील पाणी वापरून कपडे धुणाऱ्या लोकांना पालिकेने नदीपासून दूर स्वतंत्र धोबीघाट बांधून देणे गरजेचे आहे. नदीपत्रालगत कपडे धुणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. त्यातच जगबुडी नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. तरंगणाऱ्या कचऱ्यामुळे पात्र बकाल बनले आहे.
खेड पालिका प्रशासनाने काही वर्षांपूर्वी नदीपत्रात कचरा फेकणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तंबी दिल्यानंतर काहीअंशी हे प्रमाण घटले होते; मात्र आता नदीपात्र कचऱ्याने भरले आहे. जगबुडी नदीपात्रात मगरींचा वावर असून गेल्या वर्षभरात काही मगरी मेल्या आहेत. प्रदूषण वाढल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. नदीपात्रात रात्री-अपरात्री कचरा फेकणे यांचे प्रमाण वाढले आहे. फळविक्रेते, चिकन- मटण, मासेविक्रेते नदीपात्रात कचरा फेकत असल्याचे निदर्शनास आले आहे; मात्र पालिका प्रशासन सध्या कारवाईसाठी पुढाकार घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जगबुडी नदीपात्रात कचरा वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
भरतीच्या काळात खाडीभागात गाळाच्या बेटात साचलेला कचरा जगबुडी नदीपात्रात पुन्हा वाहून येतो. त्यामुळे भरतीच्या कालावधीत शहरानजीक जगबुडी नदीपात्रात कुजलेला पालापाचोळा व मानवनिर्मित फेकलेला कचरा यांचे ढीग पाण्यावर तरंगताना दिसतात.

चौकट
जगबुडी नदी संवर्धनाची मोहीम
जगबुडी नदीतील स्वच्छ पाणी कचऱ्याद्वारे दूषित करण्याचे कृत्य केले जात आहे. हे प्रकार तातडीने थांबायला हवेत. जगबुडी संवर्धनासाठी लोकचळवळीची नितांत गरज असून जगबुडी नदी वाचवण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घ्यायला हवा. अलसफा वेल्फेअरच्या माध्यमातून जगबुडी नदी संवर्धनाची मोहीम या पुढील काळात सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया अलसफा वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष शमशुद्दीन खान यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57771 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top