युवावर्गाने नशिल्या पदार्थांपासून दूर राहावे युवावर्गाने नशिल्या पदार्थांपासून दूर राहावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवावर्गाने नशिल्या पदार्थांपासून दूर राहावे
युवावर्गाने नशिल्या पदार्थांपासून दूर राहावे
युवावर्गाने नशिल्या पदार्थांपासून दूर राहावे युवावर्गाने नशिल्या पदार्थांपासून दूर राहावे

युवावर्गाने नशिल्या पदार्थांपासून दूर राहावे युवावर्गाने नशिल्या पदार्थांपासून दूर राहावे

sakal_logo
By

rat13p1९.jpg
21505
शृंगारतळीः रिगल कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोहिते.
--------------
युवावर्गाने नशिल्या पदार्थांपासून दूर राहावे
प्रमोद मोहिते; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
गुहागर, ता. १३ः नशिल्या पदार्थांच्या सेवनामुळे केवळ शरीराची हानी होत नाही तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. ऐन उमेदीत जीवन बरबाद होते. त्यामुळे युवावर्गाने कितीही मोह झाला तरी नशिल्या पदार्थ्यांपासून दूर राहावे, असे आवाहन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद मोहिते यांनी विद्यार्थ्यांना केले.
शृंगारतळीमधील रिगल कॉलेजमध्ये पोलिस विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी विद्यार्थ्यांशी बोलताना प्रमोद मोहिते म्हणाले की, व्यसनाधिनता हा स्वत:बरोबर कुटुंबाला उद्ध्वस्त करणारा मानसिक आजार आहे. सुरवातीच्या काळात रोमांचक, वेगळं काहीतरी म्हणून केलेले अंमली पदार्थांचे सेवनाची आपल्याला कधी सवय होते हे समजत नाही. केवळ वर्गात दांडगाई करणारी मुलेच या व्यसनाला बळी पडतात असे नाही. हुशार मुलेदेखील नशिल्या पदार्थ्यांच्या आहारी जातात. त्यातून पुढे निराशा येते. मग नैराश्यातून आत्महत्येसारखा चुकीचा मार्ग निवडला जातो.
तंबाखू, दारू, गांजा आणि ड्रग्ज या नशिल्या पदार्थांच्या सेवनाच्या घटना आता ग्रामीण भागातही लक्षात येत आहेत. तेव्हा युवापिढीने या पदार्थांपासून दूर राहावे. आजकाल बेदरकारपणे वाहन चालवणे, ट्रीपलसीट जाणे, परवाना नसताना वाहन चालवणे, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे हे गुन्हेदेखील घडू लागलेत. आजकाल वाहतूक पोलिस तुम्हाला पकडत नाहीत. त्यामुळे पोलिसही दुर्लक्ष करतात, असे सर्वांना वाटते; पण तसे नाही. आता वाहतूक पोलिसांच्या हातात एक मोबाईलसदृश यंत्र आले आहे. वाहन कायद्यांविरोधातील कोणत्याही कृतीचे छायाचित्र हे पोलिस टिपतात. त्यामुळे तुम्हाला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. या कारवाईमध्ये वाहनमालकाबरोबर वाहनचालकालाही नकळत मोठा दंड सोसावा लागतो. एकाच वाहनावर अधिकवेळा कारवाई झाल्यास त्या व्यक्तीचा परवाना रद्द होतो. त्यामुळे वाहन चालवताना नियमांचे उल्लंघन करू नका. त्याचा तोटा तुमच्या भविष्यावर होईल, असेही प्रमोद मोहिते यांनी उदाहरणांसह विद्यार्थ्यांना सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57778 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top