राजापूर पंचायत समिती इमारतीचे दुरुस्ती सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर पंचायत समिती इमारतीचे दुरुस्ती सुरू
राजापूर पंचायत समिती इमारतीचे दुरुस्ती सुरू

राजापूर पंचायत समिती इमारतीचे दुरुस्ती सुरू

sakal_logo
By

rat१३p१०.jpg-
२१४८७
राजापूरः पंचायत समितीच्या इमारतीच्या छप्पर दुरुस्ती कामाचा प्रारंभ करताना आमदार राजन साळवी. शेजारी सागर पाटील, प्रकाश गुरव, योगेश नकाशे आदी.
--------------
राजापूर पंचायत समिती इमारतीचे दुरुस्ती सुरू
२० लाख रुपये मंजूर ; गळती थांबणार, पावसात दिलासा
राजापूर, ता. १३ ः गेल्या काही वर्षापासून छप्पर नादुरुस्तीमुळे गळती लागलेल्या पंचायत समितीच्या इमारतीच्या छप्पर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सेस फंडातून या कामासाठी २० लाख रुपये मंजूर झाले आहेत. या छप्पर दुरुस्तीमुळे पावसाळ्यामध्ये इमारतीला लागणारी गळती थांबणार आहे.
या इमारत छप्पर दुरुस्तीच्या कामाचा प्रारंभ आमदार राजन साळवी यांच्या हस्ते झाला. या वेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. मठपती, माजी उपसभापती प्रकाश गुरव, कृषी विभागाचे विस्तार अधिकारी प्रभाकर आपटे, शिवसेना उपतालुकाप्रमुख राजन कुवळेकर, योगेश नकाशे आदी उपस्थित होते.
पंचायत समितीची इमारती जीर्ण झाली असून छप्पर नादुरुस्त झाले आहे. इमारतीवरून माकडांनी उड्या मारून अनेक ठिकाणची कौले तुललेली आहेत. काही ठिकाणचे वासे खराब झालेले आहे. त्याच्यातून गेल्या दोन-तीन वर्षापासून इमारतीला ठिकठिकाणी गळती लागलेली आहे. पावसाळ्यामध्ये या इमारतीमध्ये बसून दिवसभर काम करणे अधिकारी आणि कर्मचार्‍यांना जिकरीचे होवून जाते. पावसाच्या पाण्यामुळे कागदपत्र खराब होण्याचा धोका असल्याने अनेकवेळा ती पावसाळ्यामध्ये इकडून तिकडे हलवावी लागतात. त्यामुळे तातडीने ही इमारतीची छप्पर दुरूस्ती व्हावी अशी मागणी केली जात होती. त्याच्यातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सेस फंडातून या इमारतीच्या छप्पर दुरूस्तीसाठी वीस लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून इमारतीच्या छप्पर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57779 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top