उमराठ-आंबेकरवाडीत गुणवंतांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमराठ-आंबेकरवाडीत गुणवंतांचा सत्कार
उमराठ-आंबेकरवाडीत गुणवंतांचा सत्कार

उमराठ-आंबेकरवाडीत गुणवंतांचा सत्कार

sakal_logo
By

rat१३p१२.jpg
२१४८९
उमकाठ ः ज्येष्ठ ग्रामस्थांचा सत्कार करताना आंबेकरवाडी प्रतिष्ठानचे लक्ष्मण आंबेकर.
-------------
उमराठ-आंबेकरवाडीत गुणवंतांचा सत्कार
गुहागरः उमराठ खुर्द आंबेकरवाडी येथे श्री देव भराडा मंदिरात वार्षिक सार्वजनिक श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली होती. १०५ व्या महापुजेवेळी गुणगौरव ज्येष्ठ ग्रामस्थांचा सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केले होते. आंबेकरवाडीतील पहिली सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजा १९१८ मध्ये सुरू झाली. ग्रामस्थांमधील व्यसनाधीनतेला आळा बसावा म्हणून पहिल्या पुजेच्यावेळी नशाबंदीची शपथ ग्रामस्थांना देण्यात आली होती. तेव्हापासून सार्वजनिक हितासाठी श्री सत्यनारायणाच्या पुजेच्या आयोजनाची सुरू झालेली प्रथा आंबेकरवाडीत आजही सुरू आहे. या वर्षी आंबेकरवाडीतील १०५ व्या सार्वजनिक श्री सत्यनारायण पुजेवेळी आंबेकरवाडी प्रतिष्ठानच्यावतीने पहिली ते पदवीधर, तांत्रिक व अन्य शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारी समृद्धी आंबेकर या सर्वांचा सन्मान करण्यात आला. उमराठ खुर्द-आंबेकरवाडीतील ६० वर्षे पूर्ण केलेल्या ४० ग्रामस्थांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रभाग क्र. १ मधून बिनविरोध निवडून आलेले सरपंच जनार्दन आंबेकर, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत आंबेकर आणि अर्पिता गावणंग तसेच पोलिसपाटील वासंती आंबेकर यांचा सत्कार करण्यात आला. महापुजेच्या निमित्ताने आंबेकरवाडीचे पारंपरिक संगीत, नमन (खेळे) स्थानिक व मुंबईकर तरुण मंडळींनी सादर केले. त्यामध्ये लहान मुलांचाही सहभाग होता.
-----------
-rat१३p१३.jpg
21490
गणेश धनावडे
--------------
गणेश धनावडेंना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
गुहागरः येथील पत्रकार गणेश धनावडे यांना शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जळगाव यांच्यावतीने दिला जाणारा २०२१- २०२२ या वर्षातील तापीपूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ५ जून रोजी फोंडा- गोवा येथील अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनात होणार आहे. दरवर्षी या पुरस्कारासाठी राज्यातील दोन पत्रकारांची निवड केली जाते. या फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी सामाजिक, आरोग्य, कला, आध्यात्मिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. सन २०२१- २०२२ या वर्षातील तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार गणेश धनावडे यांना जाहीर झाला आहे. धनावडे गेली २० वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57780 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top