
सागरसुरक्षा अभियानांतर्गत क्रिक्रेट स्पर्धा
rat13p18.jpg
21504
गुहागरः सागरसुरक्षा अभियानांतर्गत क्रिक्रेट स्पर्धा.
--------------
सागरसुरक्षा अभियानांतर्गत क्रिक्रेट स्पर्धा
गुहागर , ता. १३ ः गुहागर पोलिस ठाणे याच्या पुढाकारातून सागरसुरक्षा अभियानांतर्गत क्रिक्रेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत तालुका किनारपट्टीवरील ७ गावातील खेळाडू तसेच सागररक्षक दल, पोलिसमित्र सहभागी झाले होते.
या क्रिक्रेट स्पर्धेमध्ये सागररक्षक दल, पोलिसमित्र आणि वेलदूर, अंजनवेल, रानवी, गुहागर, असगोली, धोपावे, पालशेत या गावातील काही खेळाडू सहभागी झाले होते. या सर्वांना एकत्र करून चार स्वतंत्र संघ तयार करण्यात आले. गुहागर येथील पोलिस मैदानात मर्यादित षटकांचे एकदिवस सामने घेण्यात आले. स्पर्धेतील गुणी कलाकारांना गुहागर पोलिस ठाण्यातर्फे गौरविण्यात आले. सागर सुरक्षा अभियानाचा विषय किनारपट्टीवरील गावात पोचावा. तेथील तरुणांबरोबर सागररक्षक दल, पोलिसमित्र आणि पोलिस यांचा परिचय व्हावा, संवाद व्हावा, यासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक बी. के. जाधव यांनी सांगितले. जूनमध्ये सर्व मच्छीमार आपापल्या गावी परततात, हे लक्षात घेऊन किनारपट्टीवरील सर्व गावांचा सहभाग असलेली तालुकास्तरीय पावसाळी व्हॉलीबॉल स्पर्धा भरवण्याचे नियोजन करत असल्याचेही जाधव यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57787 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..