शशी स्मृती चषकाचा मानकरी अवय्यांश इलेव्हन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शशी स्मृती चषकाचा मानकरी अवय्यांश इलेव्हन
शशी स्मृती चषकाचा मानकरी अवय्यांश इलेव्हन

शशी स्मृती चषकाचा मानकरी अवय्यांश इलेव्हन

sakal_logo
By

rat१३p१६.jpg-
२१४९९
देव्हारेः शशिकांत मांडवकर याला स्पर्धेतून आदरांजली वाहताना देव्हारे मुंबई, ग्रामस्थ व सहकारी.

शशी स्मृती चषकाचा
अवय्यांश इलेव्हन विजेता
देव्हारे येथे आयोजन ; शशिकांत मांडवकरला आदरांजली; कळकवणे उपविजेता
मंडणगड, ता. १३ः आपल्या अल्प आयुष्यात देव्हारे क्रिकेट संघाला आपल्या योगदानातून अनेक बक्षिसे आणि नावलौकिक देणाऱ्या शशिकांत गणेश मांडवकर स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून आदरांजली वाहण्यात आली. तालुक्यातील देव्हारे येथे हा स्मृतीचषक सोहळा झाला. अवय्यांश इलेवन बांद्रे चॅलेंजर्स हा संघ विजेता तर कळकवणे संघ उपविजेता ठरला.
शशीचे २१ नोव्हेंबर २०२१ रोजी निधन झाले. आपल्या खेळाने आणि सांघिक नेतृत्वामुळे देव्हारे गावाला विशेष यश मिळवून दिले. त्याच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण म्हणून देव्हारे मुंबई व ग्रामस्थ मंडळाने शशी स्मृती चषक स्पर्धेचे आयोजन केले. ही स्पर्धा देव्हारे हायस्कूलसमोर झाली. स्पर्धेत गाव टू गावमधून विभागातून कळकवणे संघाने पहिल्या दिवशी अंतिम फेरी गाठली तर दुसऱ्या दिवशी अवय्यांश इलेव्हन बांद्रे चॅलेंजर्स या संघाने अंतिम सामन्यात कळकवणे संघाचा पराभव करत या स्पर्धेचे अजिंक्यपद चॅम्पियन विजेता झाला. तृतीय पारितोषिक विकास इलेव्हन संघ देव्हारे विजेता झाला. कळकवणे संघाचा सुशील पवार हा उत्कृष्ट गोलंदाज ठरला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57788 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top