
मंगळवारी त्रैवार्षिक गोंधळ
L21517
आचरा ः ''हिर्लेवाडी वेळ''वाडीच्या नामफलकाचे अनावरणावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ.
''हिर्लेवाडी वेळ'' भागाचे''आबांची वाडी'' नामकरण
आचरा ः हिर्लेवाडी भागातील प्रत्येक वसाहतीची ओळख वेगवेगळ्या नावाने आहे; मात्र ''हिर्लेवाडी वेळ'' ओळखला जाणाऱ्या भागाचे नामकरण झालेले नव्हते. या भागाचे नामकरण सर्वानुमते आबांची वाडी असे ग्रामपंचायतच्या मंजुरीसह केले आहे, अशी माहिती आचरा उपसरपंच पांडुरंग वायंगणकर यांनी दिली.
पेडणेकर कुटुंबाचे प्रमुख (कै.) पुरुषोत्तम (आबा) पेडणेकर यांनी या भागात नंदनवन केले. या भागातील आपल्या बांधवांना सुखाचे दिवस दाखवले. त्यांच्या या कार्याची जाणीव ठेवून या भागाला आबांची वाडी असे नाव देण्यात आले असल्याचे उपसरपंच वायंगणकर यांनी सांगितले. यासाठी आचरा उपसरपंच पांडुगरण वायंगणकर, ग्रामपंचायत सदस्या रेश्या कांबळी यांनी मेहनत घेतली. वाडीच्या नामफलकाचे अनावरण उयोजक जयंत पांगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व पेडणेकर बांधव हजर होते.
--------------
L21518
- आंबडोस ः देवारा
आंबडोस दळवी घराण्याचा मंगळवारी त्रैवार्षिक गोंधळ
ओरोस ः क्षत्रिय गडकरी मराठा समाजातील दळवी घराण्याचा त्रैवार्षिक गोंधळ १७ मेस होत आहे. आंबडोस-व्हाळवाडी येथील दळवी घराण्याची आकार भवानी वास्तव्यास असलेल्या घरात हा गोंधळ होत आहे. यानिमित्त उद्या (ता.१४) होम आयोजित केला आहे. गोंधळा दिवशी सकाळी गोडे जेवण झाल्यावर देवीला भक्ष्य देण्यात येणार आहे. सायंकाळी भाविकांसाठी महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर देवीचा मांड भरविला जाणार आहे. देवीचा मांड भरल्यावर दिवट्या प्रज्वलित केल्या जाणार आहेत. यानंतर प्रथम पाहुणे नंतर माहेरवाशिणी यांच्या ओट्या भरून झाल्यावर दळवी भावकीच्या ओट्या भरल्या जाणार आहेत. यानंतर गोंधळी कथा कथन करणार असून कथा संपताच मृत नातेवाईकांच्या नावाने ओवाळणी करून त्यांची आठवण केली जाणार आहे. यानंतर देवीकडे समस्या मांडल्या जाणार आहेत. याचा लाभ भाविक, दळवी नातेवाईक, आंबडोस पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी घ्यावा, असे आवाहन दळवी भावकीच्यावतीने करण्यात आले आहे.
---------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57797 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..